१५ जूनपासून राज्यात शाळा सुरु? वर्षा गायकवाड यांनी दिले संकेत
X
राज्यात कोरोनाच्या वाढत्य़ा रुग्णसंख्येमुळे सतत लॉकडाऊनच्या कालावधी वाढवला जातोय. या काळात विद्यार्थ्यांचं शैक्षमिक नुकसान होत असल्यामुळे १५ जूनपासून शाळा सुरु करण्याचा विचार केला जात असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) य़ांनी दिली आहे. पहिल्या टप्प्यात रेड झोन नसलेल्या भागात शाळा सुरु केल्य़ा जातील असे संकेत त्य़ांनी दिले आहेत. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात, महाराष्ट्रात मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर आणि रेड झोनमधील अन्य 15 शहरे आहेत.
हे ही वाचा...
- 31 मे नंतर लॉकडाऊन उठणार? पाहा काय म्हणतायत उद्धव ठाकरे
- ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन फेल करणारी तीन पक्षांची ‘ट्रोल आर्मी’
- चंद्रकांतदादा विरोध कुठे आणि कधी करायचा पुणेकरांकडून शिका
लॉकडाऊन सुरु झाल्यापासून शाळा महाविद्यालातील परिक्षा रद्द करण्यात आल्यात तसेच पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र, अद्यापही लॉकडाऊन उठवण्यासंबंधी कोणतीच निश्चितता नसल्याने विद्यार्थ्यांच नुकसान होत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी शिफ्टमध्ये वर्ग चालवणं, शाळेचे तास कमी करणं, सकाळच्या शाळेत होणाऱ्या प्रोग्रामवर बंदी घालणं अशा मार्गांचा अवलंब करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती वर्षा दायकवाड यांनी दिल्याचं इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तात म्हटलं आहे.
“सामाजिक अंतरण आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना सम विषम रोलनुसार वेगवेगळ्या शिफ्टमध्ये बोलवण्याचा विचार केला जात आहे. दुसरा पर्याय म्हणजे प्रत्येक पर्यायी दिवशी वर्गातील विद्यार्थ्यांच्या तुकडीला कॉल करून त्यांना सांगायचं की, कोणत्याही परिस्थितीत सामाजिक अंतर ठेवणं. एका डेस्कवर फक्त एका विद्यार्थ्याला परवानगी असेल अशा सूचना देणं.” असे पर्याय वापरण्याची शक्यता वर्षा गायकवाड य़ांनी वर्तवली. परंतु मुंबईतील रेड झोनमध्ये असलेल्या इतर शाळांमदध्ये याचा विचार होऊ शकत नाही. शाळा पुन्हा सुरू करण्याच्या योजनेपूर्वी काही गोष्टी सुधारण्याची गरज असल्याचही त्यांनी म्हटलं आहे.