Home > मला सैन्याची गरज नाही, हा शिवरायांचा महाराष्ट्र- उद्धव ठाकरे
मला सैन्याची गरज नाही, हा शिवरायांचा महाराष्ट्र- उद्धव ठाकरे
Max Woman | 8 May 2020 9:29 PM IST
X
X
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 18 हजारांच्यावर गेली आहे. मुंबईत कोरोना व्हायरस ची संख्या वाढत आहे. त्यातच आज राज्यात काही सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या गेल्या आहेत. तसंच अधिकारी ऐकत नाहीत, अशा तक्रारी लोकप्रतिनीधी करत आहेत. अधिकारी आणि लोकप्रतिनिधी असा संघर्ष निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी जनतेशी संवाद साधला.
सायन मध्ये कोव्हीड 19 च्या मृत रुग्णांच्या जवळच रुग्णांवर उपचार करत असलेला व्हिडीओ व्हायरल झाला होता. या संदर्भात बोलताना उद्धव ठाकरे यांनी गलथान कारभार सहन केला जाणार नाही. गलथान कारभार, दफ्तर दिरंगाईला क्षमा केली जाणार नाही. असा सज्जड दम भरला आहे.
हे ही वाचा...
- मुंबई महापालिका अतिरिक्त नगर आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची वर्णी
- MLC Election: पंकजा मुंडेंचा पत्ता कट, कशी होणार नाराजी दूर?
- अर्णब गोस्वामींची कोंडी, दोन वर्षापुर्वीचं ‘ते’ आत्महत्या प्रकरण पुन्हा बाहेर
राज्यातील परप्रांतीयांचा मोठा प्रश्न आहे. ज्या लोकांचे हाताचे काम गेले. त्यांच्या हाताला काम देणं गरजेचं आहे. त्यातच विधानपरिषद निवडणुकीमुळे राज्यात राजकीय वातावरण तापण्याची चिन्ह आहेत. लोकांचा धीर सुटत चालला असताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला पाहा काय म्हणाले मुख्यमंत्री..
काय म्हणाले उद्धव ठाकरे…
मुंबईत लष्कराची गरज नाही. जे काही मी करत आहे. तुम्हाला विचारुन करत आहे. गेले काही दिवस अफवा पसरवले जात आहे. मुंबईत लष्कर येणार नाही. काळजी करु नका.
केंद्र सरकार ने आपल्याला त्यांची हॉस्पिटल, डॉक्टरर्स देण्याची तयारी दर्शवली आहेत.
डॉक्टर आणि पोलिसांना विश्रांती देणं गरजेची… त्यामुळं जर गरज पडली तर लष्कर बोलावू. पोलिसांना आराम देणं गरजेचं आहे.
परप्रांतीय लोकांना पोहोचवणं गरजेचं आहे. तसंच आपली लोक अडकली आहेत. त्यांना परत आणायचं आहे. मात्र, हे सगळं करताना मोजून मापून करत आहोत.
लॉकडाऊन हा गतिरोधक आहे. मात्र, चैन तोडण्यात आपण अयशस्वी झालेलो नाहीत. त्यामुळं आपल्याला लॉकडाऊन कडकपणे पाळावे लागणार आहेत.
टेस्ट कमी होणार नाहीत. टेस्ट सुरु राहतील. काही लोक शेवटच्या क्षणी हॉस्पिटलमध्ये येतात.
राज्यात 18 हजार पॉझिटीव्ह
काही कोव्हीड पॉझिटीव्ह मातांना झालेल्या बाळाला कोव्हिड ची लागण झालेली नाही. हा निसर्गाचा चमत्कार आहे.
गलथान कारभार सहन केला जाणार नाही. गलथान कारभार, दफ्तर दिरंगाई ला क्षमा केली जाणार नाही.
आयुष, आयुर्वेद, होमिपॅथी डॉक्टरांनी या लढाईत सहभागी व्हावी, त्यांना मी विनंती करतो. या लढाईत सहभागी व्हावं…
लॉकडाऊन वाढवणं कोणालाही आनंद नाही… शिस्त पाळली तर लॉकडाऊन वाढवलं जाणार नाही.
मला लष्कराची गरज नाही. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे.
Updated : 8 May 2020 9:29 PM IST
Tags: cm-uddhav-thackeray Corona Virus covid -19 SHIVSENA उद्धव ठाकरे कोरोना व्हायरस कोविड १९ शिवसेना
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire