Home > Political > मंत्रिमंडळ विस्तार महिलेविना ...महिलांना संधी का नाही ?

मंत्रिमंडळ विस्तार महिलेविना ...महिलांना संधी का नाही ?

मंत्रिमंडळ विस्तार महिलेविना ...महिलांना संधी का नाही ?
X

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधीला एक महिना उलटून गेल्यानंतरही मंत्रीमंडळाचा विस्तार झाला नव्हता. मात्र आता अखेर मंत्रीमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला आहे. मंगळवारी मंत्रीमंडळ विस्तार झाला आहे . भाजपच्या ९ आमदारांची मंत्रिपदाच्या यादीत वर्णी लागली आहे .तसेच शिंदे गटाच्या ९ आमदारांना मंत्रिपद मिळाले आहे .भाजप आणि शिंदे गटाचे मिळून १८ आमदारांच्या मंत्रिपदाचा शपथविधी आज पार पडणार आहे.पण यामध्ये एकही महिला आमदार नसल्याचे दिसून येत आहे.भाजपच्या चित्रा वाघ यांचं नाव चर्चेत असताना एकही महिला मंत्री या मंत्रिमंडळ विस्तारात नसल्याचे दिसून येत आहे.

शिंदे-फडणवीसांनी शपथ घेऊन 39 दिवस उलटून गेले आहेत. या दिवसांमध्ये राज्यात पावसानं धुमाकूळ घातला. शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. दोघांचंच मंत्रिमंडळ असल्यानं शिंदे आणि फडणवीसांनी काही ठिकाणी दौरे देखील केले. मात्र जिल्ह्यांना पालकमंत्री नसल्यानं आणि मंत्रिमंडळ नसल्यानं म्हणावं तसं लक्ष दिलं गेलं नाही, असं म्हणत विरोधकांसह सामान्य जनता देखील सरकारवर टीका करु लागली होती.त्यामुळे १८ आमदारांचा शपथविधी सोहळ्यासह मंत्रिमंडळ विस्तार मंगळवारी झाला आहे.

Updated : 9 Aug 2022 11:51 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top