Cabinet Expansion : मंत्रिमंडळात कोणत्या महिलेला संधी मिळणार?
X
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर महिलांना मोठी संधी मिळेल असं म्हटलं जात आहे. कारण भाजपमध्ये सर्वाधिक म्हणजेच १३ व शिंदे गतासोबत 4 महिला आमदार आहेत. त्यामुळे आज होणाऱ्या मंत्रांडळाच्या विस्तारत महिलांना संधी मिळणार असल्याचे म्हंटले जात आहे. तर आज होमाच्या या मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला संधी मिळू शकते?
पुरोगामी महाराष्ट्राला आजपर्यंत एकही महिला मुख्यमंत्री मिळाल्या नाहीत. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यापासून आजपर्यंत इतक्या वर्षात एकही महिला मुख्यमंत्री का झाल्या नाहीत? हीच परिस्थिती विरोधी पक्ष नेते पदासाठी सुद्धा आहे. विरोधीपक्षनेत्या म्हणून 1985 ते 1990 या कालावधीत मृणालताई गोरे यांना विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्या म्हणून संधी मिळाली. पण त्यानंतर कोणीच महिला या पदावर आल्या नाहीत. महिलांविषयी पक्षांची हि मानसिकता का? कोणत्याच पक्षाला महिला मुख्यमंत्री किंवा पुन्हा महिला विरोधीपक्ष नेत्या व्हाव्या असं वाटलं नाही का? इतकंच काय मंत्रिमंडळात देखील महिलांची संख्या ही पुरुषांच्या तुलनेत नेहमीच कमीच असते. त्यामुळे आता सर्वाधिक महिला आमदार असलेल्या भाजप पक्षाकडून महिलांना किती संधी दिली जाते काही महत्वाच्या खात्यांची जबाबदारी दिली जाऊ शकते का?
नवीन सरकार मध्ये किती महिला आमदार..
तर सध्या शिवसेनेतील बंडखोर गट व भाजप असे मिळून राज्यात नवीन सरकार स्थापन झाला आहे. या सरकारमध्ये असलेल्या महिला आमदारांची संख्या पाहिली तर शिंदे गटासोबत चार महिला आमदार आहेत. त्यामध्ये यामिनि जाधव, लता सोनवणे व अपक्ष आमदार गीता जैन यांचा सहभाग आहे. तर भाजपमध्ये २४ महिला आमदार आहेत. या दोन्ही गटाचे मिळून एकूण २८ महिला आमदार या नवीन सरकार मध्ये आहेत. यातील किती महिलांना मंत्रिमंडळात संधी मिळणार हे पाहावं लागेल.
शिंदे फडणवीस सरकार मधील विधानसभेतील महिला आमदार..
मंदा म्हात्रे - बेलापूर - भाजप
मनीषा चौधरी - दहिसर - भाजप
विद्या ठाकूर - गोरवगाव - भाजप
देवयानी फरांदे - नाशिक मध्य - भाजप
सीमा हिरे - नाशिक पश्चिम - भाजप
माधुरी मिसाळ - पर्वती - भाजप
मोनिका राजळे - शेवगाव - भाजप
भारती लव्हेकर - वर्सोवा - भाजप
मुक्ता टिळक - कसबा पेठ - भाजप
नमिता मुंदडा - केज - भाजप
श्वेता महाले - चिखली - भाजप
मेघना बोर्डीकर - जिंतूर - भाजप
शिंदे गटातील महिला आमदार -
यामिनि जाधव
लता सोनवणे
गीता जैन