31 मे नंतर लॉकडाऊन उठणार? पाहा काय म्हणतायत उद्धव ठाकरे
X
आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी फेसबूक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. राज्यात कोरोना ची परिस्थिती हाताळण्यास राज्यसरकार अपयशी ठरलं असं म्हणत आंदोलन करणाऱ्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis ) यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेलक्या शब्दात समाचार घेतला. तसंच येत्या काळात राज्यात कोरोना व्हायरस च्या रुग्णांची संख्या वाढेल. असं देखील मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधताना सांगितले.
हे ही वाचा...
- ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन फेल करणारी तीन पक्षांची ‘ट्रोल आर्मी’
- चंद्रकांतदादा विरोध कुठे आणि कधी करायचा पुणेकरांकडून शिका
- आध्यात्मिक वाचनातून केला राजकारणाला राम राम, पत्नीच्या हाती सोपवली धूरा
पुढच्या १५ दिवसात देशाचं चित्र स्पष्ट होईल, कारण स्थलांतर मोठ्या प्रमाणात झालं आहे असं मी सोनिया गांधी यांच्यासह झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये सांगितलं. सध्या महाराष्ट्रात ५० हजार उद्योग सुरु झाले आहेत. सहा लाख कामगार हे कामावर रुजू झाले आहेत. लॉकडाउन एकदम करणं हे जसं चुकीचं आहे तसंच लॉकडाउन एकदम उठवणंही चुकीचं ठरेल. हळूहळू सगळ्या गोष्टी आपण सुरु करतो आहोत. मात्र हे सगळं करत असताना स्वयंशिस्त पाळली जाणं अत्यंत गरजेचं आहे. जर शिस्त दिसली नाही, गर्दी झाली तर मात्र सगळं काही पुन्हा बंद करावं लागेल.
यावेळी राज्यसरकारवर वारंवार टीका करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्र्यांनी चांगलाच टोला लगावला.
केंद्राकडे पैसे अडकलेत, पीपीई किट ला परवानगी उशीरा मिळाली, धान्याचा प्रश्न आहे, रेल्वे तिकिटांची समस्या.... मारू बोंब? नाही. मी राजकारण करणार नाही. संकटाचा काळ आहे. मी महाराष्ट्राची संस्कृती जपतोय. असं म्हणत फडणवीसांना चांगलाच टोला लगावला.
राज्यसरकार कडून आर्थिक पॅकेजची मागणी करणाऱ्या फडणवीसांचे नाव न घेता उद्धव ठाकरे यांनी जोरदार निशाणा साधला. पॅकेज का नाही दिलं असा प्रश्न विचारतात, लाखो कोटींची पॅकेज वाटली, पण हाती आलं काय? आरोग्य सुविधा निर्माण करणे महत्त्वाचे, अन्न धान्य आणि उपचार हे पॅकेजपेक्षा महत्त्वाचं, सर्व वर्गासाठी मदत करणं महत्वाचं आहे. असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पॅकेजची मागणी करणाऱ्या फडणवीस यांना उत्तर दिलंय.
कोरोनाच्या काळात सर्व सण समारंभ आपण घरीच साजरे केले आहेत. मुस्लीम बांधव सहकार्य करत आहेतच, ईदही कुठे गर्दी न करता, रस्त्यावर न येता घरी प्रार्थना करुन साजरी करा. असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय. तसंच कोरोना संकट दूर होण्यासाठी दुआ करा अशी विनंती त्यांनी केली.
राज्यात आता पुन्हा रक्तदानाची गरज निर्माण झाली असून पुढील आठ ते दहा दिवस पुरेल असा रक्तसाठा उपलब्ध आहे. सुरवातीच्या काळात मोठ्या प्रमाणात रक्तदात्यांनी रक्तदान केलं होतं. त्य़ावरच आतापर्यंत उपचारादरम्याना रुग्णांना रक्त पुरवता आलं. मात्र, आता पुन्ही इच्छुक रक्तदात्यांनी पुढे यावं आणि रक्तदान करावं असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.