Home > Political > "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार", आदिती तटकरेंचं विधान

"मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार", आदिती तटकरेंचं विधान

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार, आदिती तटकरेंचं विधान
X

सध्या लाडकी बहीण योजनेची चर्चा सर्वत्र सुरू आहे. महिलांच्या खात्यात पैसे देखील जमा झाले आहेत. पण निवडणुकीच्या तोंडावर सध्या लाडकी बहीण योजना याबाबत अफवा सुरू आहेत.

राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना महिन्याला १५०० रुपये दिले जात आहेत. या योजनेमुळे मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आनंदी झाल्या आहेत. अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. परंतु योजना मध्येच बंद करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. ज्यामुळे आता ही योजना बंद झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात तसेच महिलांमध्ये देखील सुरू झाली असून विरोधकांनी सुद्धा ही योजना बंद झाल्याचा जोरदार प्रचार सुरू केला. परंतु या सगळ्या प्रकरणावर महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत खुलासा करत या योजनेबद्दल माहिती दिली आहे.

राज्यात लाडकी बहीण योजना बंद झाल्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतर सत्ताधारी मंत्र्यांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. ज्यानंतर मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत पोस्ट करत म्हटले की, "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार !! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै २०२४ पासून सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र भगिनींना दरमहा १५०० रुपये थेट त्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात जमा केले आहेत. शासनाने जुलै, ऑगस्ट, आणि सप्टेंबर २०२४ या महिन्यांसाठीचा लाभ आधीच पात्र भगिनींच्या खात्यात जमा केला आहे. तसेच ४ ते ६ ऑक्टोबर २०२४ दरम्यान ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांचा लाभ राज्यातील २ कोटी ३४ लाख पात्र भगिनींना देण्यात आला आहे. सर्व पात्र भगिनींना डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्यात देण्यात येणार असून या योजनेबाबत कोणत्याही चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील माता भगिनींनी बळी पडू नये ही नम्र विनंती !" असे आवाहन महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.

Updated : 20 Oct 2024 12:31 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top