राज ठाकरे यांचं उत्तर भारतीय लोकांवर खूप प्रेम - कांचन गिरी
X
राज ठाकरे यांचे उत्तर भारतीय लोकांवर खूप प्रेम आहे. युपी- बिहार मधील लोक मुंबई मध्ये येऊन काम करतात. त्यांना मुंबईत राहताना काळजी करण्याचे काही कारण नाही. राज ठाकरे यांचा या लोकांवर राग नसून बिहारमध्ये इंडस्ट्रीज सुरू झाल्या तर लोकांना तिथेच रोजगार मिळेल. त्यांना घर सोडावे लागणार नाही. अशी त्यांची भूमिका आहे. पण त्यांच्या या भूमिकेला चुकीच्या पद्धतीने मांडलो. ते जितके प्रेम महाराष्ट्रातील लोकांवर करतात तितकेच प्रेम उत्तर भारतीय लोकांवर देखील करतात. असे वक्तव्य कांचन गिरी यांनी राज ठाकरे यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना केला.
यावेळी त्यांनी राज ठाकरे हे आयोध्याला कधी भेट देणार याबाबत देखील वक्तव्य केले. राज ठाकरे डिसेंबर मध्ये आयोध्याला येण्याचा विचार करत असून जे हिंदुत्वावर प्रेम करतात ते आयोध्येशी जोडलेले आहेत. सर्व साधुसंत राज ठाकरे यांच्या सोबत आहे. ते अयोध्येत त्यांचे मोठे स्वागत देखील करतील.
त्यांनी आज मुंबई येथे राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज वर जाऊन भेट घेतली. त्यांच्यात हिंदुत्वाच्या मुद्यावर चर्चा झाली. त्यांनी हिंदुराष्ट्राच्या मजबुत बांधणीसाठी ही भेट घेतली आल्याच म्हंटले आहे. यावेळी त्यांनी, भारताची पुढील दहा वर्षानंतर अफगाणिस्तानसारखी स्थिती होऊ शकते. 10 वर्षानंतर नंतर हिंदूंना शरणार्थी बनावे लागेल. हिंदुस्तान त्या धोक्याच्या किनार्यावर आहे.आज हिंदू जागे झाले नाही तर कधी जागे होणार नाहीत असं देखील कांचन गिरी म्हणाल्या