Home > ‘तुमचा भाऊ तुमच्या सोबत..’ जयंत पाटलांचं परिचारीकांना भावनिक पत्र

‘तुमचा भाऊ तुमच्या सोबत..’ जयंत पाटलांचं परिचारीकांना भावनिक पत्र

‘तुमचा भाऊ तुमच्या सोबत..’ जयंत पाटलांचं परिचारीकांना भावनिक पत्र
X

जागतिक परिचारिका दिनी जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी परिचारिकांना भावनिक पत्र लिहत कोरोनाच्या युद्धात त्यांच्या अमुल्य योगदानाची स्तुती केली आहे. या साऱ्या काळात तुम्ही स्वत:ची आणि कुटुंबियांची काळजी घ्या. तुमचा भाऊ म्हणून मी तुमच्यासोबत आहे असा धीर दिला आहे.

आज सारे जग Covid 19 सारख्या अत्यंत गंभीर युद्धात लढत असताना, या युद्धात सैनिक मात्र तुम्ही साऱ्या परिचारीका आहात. या लढाईचे नेतृत्व देखील तुमच्याकडेच आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून तुम्ही समाजाची सेवा करत आहात. तुमच्या मेहनतीमुळेच सारे जग कोविड १९ च्या संकटातून बाहेर पडेल. असं या पत्रात लिहत परिचारिकांच्या सेवेची आम्हाला जाणीव असल्याची भावना त्यांनी व्यक्त केलीय.

Updated : 12 May 2020 4:43 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top