Home > Political > दिल्लीत शेतकऱ्यांना धक्काबुक्की ही केंद्र सरकारची हुकूमशाही – मंत्री वर्षा गायकवाड

दिल्लीत शेतकऱ्यांना धक्काबुक्की ही केंद्र सरकारची हुकूमशाही – मंत्री वर्षा गायकवाड

दिल्लीत शेतकऱ्यांना धक्काबुक्की ही केंद्र सरकारची हुकूमशाही – मंत्री वर्षा गायकवाड
X

गेल्या दोन महिन्यांपासून शांततेत आंदोलन कऱणाऱ्या शेतकऱ्यांच्या दिल्लीमधील ट्रॅक्टर मोर्चाला हिंसक वळण लागले आहे. दिल्लीमधील मोर्चाचा ठरलेला मार्ग सोडून आंदोलकांनी थेट लाल किल्ल्यावर धडक मारली. तिथे या आंदोलकांनी सुरक्षा भेदत किल्ल्याच्या दर्शनी भागावर शेतकरी संघटनेचा ध्वज फडकावला.

या सर्व प्रकरणावर राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केंद्र सरकारवर टीका केली असून "लोकशाहीच्या अत्यंत महत्वपूर्णदिनी शेतकऱ्यांना धक्काबुक्की करणे, हे दुर्देवी आहे. हा संविधानाचा अपमान असून केंद्र सरकार क्रूर हुकूमशाहीचे दर्शन घडवत आहे. 'शेतकरी टिकला, तरच देश टिकेल', हे केंद्र सरकारने लक्षात घ्यावं. जय हिंद!" असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, शेकडो आंदोलक लाल किल्ल्यामध्ये घुसले आहेत. तर दिल्ल्लीच्या विविध भागांमध्ये आंदोलकांनी पोलिसांवरही दगडफेक केली आहे. यामध्ये काही पोलीस जखमी झाले आहेत.



Updated : 26 Jan 2021 3:49 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top