केंद्र सरकार आणिबाणी लादण्याचा प्रयत्न करतय : सुप्रिया सुळे
X
कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडची जागा केंद्र सरकारची असल्याचा दावा केंद्र सरकारने केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने आरे मध्ये मेट्रो कारशेड करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी फडणवीस सरकारने रात्रीतून झाडं तोडण्याचं काम केलं होतं. मात्र, राज्यात उद्धव ठाकरे यांचं सरकार आल्यानंतर आरेतील कारशेड कांजुरमार्ग येथे हलवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता केंद्र सरकारने कांजुरमार्ग ची जागा केंद्र सरकारची असल्याचं सांगत काम थांबवण्याचं पत्र राज्याच्या मुख्य सचिवांना पाठवलं आहे. यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली....
राज्याचे सगळे अधिकार काढून घेण्याचे पाप केंद्र सरकार करतंय. हे त्यांच्या कृतीतून दिसते असून हे दुर्दैवी आहे. महाराष्ट्र राज्याच्या विकासामध्ये केंद्रसरकार हस्तक्षेप करतेय हे निंदनीय आहे. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रसरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मेट्रो कारशेडबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार टीका केली आहे.
खरं तर ती जमीन महाराष्ट्राची आहे. ज्या राज्याची जमीन असते. त्यावर पहिला अधिकार हा त्याच राज्याचा असतो. भाजपचे नेते कोणत्या आधारावर टीका करतायत. जमीन महाराष्ट्राची आहे ती विकास कामासाठी वापरली जातेय. या देशात केंद्रसरकार हळूहळू आणीबाणी आणतंय असं चित्र आहे. अशी टीका देखील सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.