सरकार पडताच काही तासात सुप्रिया सुळेंनी कापला केक...
X
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्य सरकार अल्पमतात आले होते. तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उध्दव ठाकरे यांना बहूमताची चाचणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिला आहे. मागच्या काही दिवसांपासून शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात अस्थिरता निर्माण झाली होती. एकनाथ शिंदे यांनी बंद करत चाळीसहून अधिक आमदार सुरुवातीला सुरत आणि त्यानंतर गुवाहाटीला घेऊन जात बंड केला. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले होते आणि या सगळ्या राजकीय नाट्यानंतर आज राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी उद्या 30 जुलै रोजी फ्लोर टेस्ट करण्याचे निर्देश दिले. राज्यपालांच्या या निर्णयानंतर महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सायंकाळी पाच वाजता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आणि उद्याच बहुमत चाचणी घेण्यावर सर्वोच्च न्यायालय सुद्धा ठाम राहिले. या निकालानंतर काही वेळातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राज्यात एकीकडे या घटना घडत असताना महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कापलेल्या केक ची सध्या जोरदार चर्चा आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांचा आज वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त त्यांनी त्यांची दोन मुले व त्यांच्या पतीसोबत वाढदिवस साजरा केला आहे. त्यांनी त्यांच्या वाढदिवसाचे केक कापत असतानाचे फोटो समाज माध्यमांवर शेअर केले आहेत. फोटो शेअर करत त्यांनी म्हंटले आहे की, "Blessed! My Kids - My Joy, My Happiness, My Strength and My Weakness 💞" एकीकडे महाविकास आघाडी सरकार कोसळत असताना सुप्रिया सुळे यांनी केक कापत साजरा केलेल्या या वाढदिवसामुळे समाज माध्यमांवर जोरात चर्चा सुरू आहे.