‘शिवाजी महाराजांच्या नावावर अवैध धंदे’, तृप्ती देसाईंनी दाखवले पुरावे
X
मागील काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून अक्षय बोऱ्हाडे (Akshay Borhade) या मनोरुग्णांची सेवा करणाऱ्या तरुणास मारहाण झाल्याचं प्रकरण महाराष्ट्रभर गाजलं आहे. जुन्नर तालुक्यातील शिरोली बुद्रुक येथील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर (SatyaShil Sherkar) व अक्षय बोऱ्हाडे यांच्यातील हा वाद होता. पण आता हे प्रकरण मिटलं असल्याचा व्हिडीओ अक्षय बोऱ्हाडे आणि सत्यशील शेरकर यांनी गळाभेट घेत सोशल मीडियावर शेअर केला आहे.
हे ही वाचा..
- क्रिकेटर मोहम्मद शमीच्या पत्नीचा न्युड फोटो पाहून नेटकरी अवाक्
- कोविड रूग्णालयाच्या तक्रारी पालकमंत्र्यांच्या कानावर, थेट घेतली रुग्णांची भेट
- ‘खासदार प्रज्ञा ठाकूर हरवल्या आहेत’; मध्यप्रदेशात पोस्टरबाजीचं राजकारण
यावर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी ‘हे प्रकरण मिटवलं नसून अक्षयला पाठींबा देणाऱ्या उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि संभाजीराजे भोसले (SambhajiRaje Bhosale) यांना त्याने फसवलं आहे.’ अशी टीका केलीय. त्यांनी फेसबुक लाइव्ह च्या माध्यमातून अक्षय बोऱ्हाडे या तरुणाविरोधात गावकऱ्यांनी दिलेले पुरावे दाखवत अनेक गंभीर आरोप केले आहेत.
अक्षय बोऱ्हाडे शिवऋण या संस्थेच्या माध्यमातून मनोरुग्णांची सेवा करत असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, शिवऋण संस्थेतील मनोरुग्ण मयत व्यक्तींना स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी केल्यानंतर गावामध्ये ग्रामपंचायतीकडे त्याच्या नोंदी केलेल्या नाहीत असा खुलासा तृप्ती देसाई यांनी केलाय. या संस्थेची कोणतीही परवानगी ग्रामपंचायतीकडून घेतली नसून संस्थेच्या आड अनेक अवैध धंदे केले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. ग्रामपंचायतीने पोलिसांना अक्षय बोऱ्हाडेच्या शिवर्ऋण संस्थेविरोधात तक्रार दाखल करुनही त्यावर कोणतीच कारवाई न झाल्याचं गावकऱ्य़ांचं म्हणणं आहे.
[gallery columns="1" size="full" bgs_gallery_type="slider" ids="14009,14010"]
तृप्ती देसाई यांनी म्हटलंय की,
“सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणीतरी रडत येतं. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचं नाव घेतं आणि तुम्ही भावनिक होऊन त्याला पाठींबा देता. तुम्ही सत्यपरिस्थिती कधीच बघत नाही, दुसरी वाजू कधीच वघत नाही. जेव्हा अमोल कोल्हे म्हणतात दोन्ही बाजू तपासा तेव्हा त्यांनाही ट्रोल करता. अक्षय बोऱ्हाडे मनोरुग्णांसाठी काम करतो आहे पण, शहाणे असलेले मनोरुग्ण सोशल मीडियावर आहेत ज्यांना सत्यपरिस्थिती कधीच जाणून घ्यायची नसते.
सर्व सामान्यांनी हे सत्य स्विकारायलाच हवे अक्षय मोहन बोऱ्हाडे कोणाचे आभार मानतो आहे. हे बघा जरा आणि हे सर्व कोण आहेत माहित नसेल तर यूट्यूबला चेक करा. हा मुलगा गुन्हेगारी टोळीशी परिचित आहे हे ऐकले होते. परंतु त्याच्या कालच्या लाईव्ह वरून आता सिद्ध झाले आहे की, हा आवाज त्याचा नाही. त्यामुळे आंधळ्या डोळ्यांनी पाठिंबा देणाऱ्यांनी सत्य गोष्टीला खोटे ठरवू नये.
अक्षय बोऱ्हाडे गुन्हेगारी टोळीशी परिचित आहे. म्हणूनच तो लाईव्हमध्ये म्हणत होता का? की माझे हे काम बंद झाले तर मी नामचीन गुंड होईन. तो मनोरुग्णांची सेवा करतो म्हणून त्याचे आमच्याकडून अभिनंदनच परंतु या व्हिडिओमध्ये भाऊसाहेब आंधळकर हे नाव सोडले, तर इतरांची माहिती युट्युब आणि गुगलवर मिळेलच.
हा व्हिडिओ मी टाकला म्हणून घाबरून जाऊन काल रात्रीचा व्हिडिओ अक्षय बोऱ्हाडेने डिलीट करू नये म्हणजे झाले. आम्ही तो डाउनलोड केलाय त्यामुळे काही टेन्शन नाही. जुन्नर पोलिसांनी त्याचे सहा महिन्यातील कॉल रेकॉर्डिंग तपासावे, तसेच त्याला मारहाण करण्यात आली अशा स्वरूपाचा व्हिडिओ लाइव्ह आला त्यानंतरचे सुद्धा कॉल रेकॉर्डिंग तपासावेत. म्हणजे त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी समजू शकेल”
काय आहे प्रकरण?
शिवऋणचे अक्षय बोऱ्हाडे याने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून समाज माध्यमात व्हायरल केलेल्या व्हिडीओमध्ये आपणास अमानुष मारहाण झाल्याचे म्हटले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे भोसले यांनीही त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठींबा दर्शवल्यानंतर राज्यभरात हे प्रकरण पसरलं आणि शीवप्रेमींनी अक्षय बोऱ्हाडे याला पाठींबा दर्शवला होता.
यावर सत्यशील शेरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याबाबत खुलासा करताना मारहाणीच्या आरोपांचे खंडन केले होते. देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून ग्रामीण भागात तो पसरू नये यासाठी गावपातळीवर आम्ही खबरदारी घेत असून, अक्षयच्या संस्थेत नव्याने काही मनोरूग्ण दाखल होत असल्याचे समजल्याने त्यास ग्रामस्थांनी शेरकर यांच्या घरी समज देण्यासाठी बोलावून घेतले होते. या घटनेचा विपर्यास करून अक्षयने आपल्यावर मारहाणीचे खोटे आरोप केल्याचं शेरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं.