महिलांना पुरुषांनी ओवाळले, तर ते तुम्हाला नको आहे का?- चित्रा वाघ
X
भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यात पार पडलेल्या कार्यक्रमात भाजपाचे नेते व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची तुलना महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी केली होती, यावर अनेक प्रतिक्रिया उमलट्या होत्या, या विधानावरून विरोधकांनी जोरदार टीका चित्रा वाघ याच्यावर केली.
याबाबत चित्रा वाघ यांना विचारले असता त्या म्हण्याला की, रिकामटेकड्या लोकांना काय वादच लागतात. त्यांना काही काम आहे का? मी एवढंच म्हटले की, महिलांना पुरुषांनी ओवाळले, तर ते तुम्हाला नको आहे का? ती चांगली गोष्ट आहे ना, चंद्रकांत दादांनी भाषणात नेहमी बहिणी भावाला ओवळतात. आमचं अभिष्टचिंतन करतात, आमच्यासाठी यश मागतात, मग आम्ही बंधू नी ही बहिणींसाठी यश मागितलं तर ते कुठे वाईट आहे. मला आतापर्यंत पाच पुरुषांनी ओवाळलं आहे. हे दादांमुळे शक्य झाले आहे. त्यामुळे दादांची तुलना कुठेही ज्योतिबा फुलेंशी केली नाही. महात्मा ज्योतिबा फुले यांनी काय केल? तर त्यांनी सावित्रीबाई फुले यांना पुढे केले. त्यामुळे महिलांना जर ज्योतिबाकडून म्हणजेच पुरुषांकडून ओवाळलं जात असेल तर त्यामध्ये वाईट काय आहे. मी राष्ट्रवादी असताना प्रत्येक वेळी ते वाक्य वापरले आहे, तेव्हा कोणीच आक्षेप घेतला नाही. त्या आठवण करून देत त्यांनी राष्ट्रवादीवर टीका केली.