लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी जर मविआच्या रॅलीत दिसले तर... धनंजय महाडिक यांचं वादग्रस्त वक्तव्य
X
राज्य सरकारच्या "मुख्यमंत्री लाडकी बहीण" योजनेबाबत सध्या राजकीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी कार्यक्रमात लाडकी बहीण योजनेवर भाष्य. वाचा सविस्तर बातमी....
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय खळबळ माजली आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचे एक वादग्रस्त विधान समोर आले आहे. धनंजय महाडिक म्हणाले की, "लाडकी बहीण योजनेतून पैसे घेणाऱ्या महिला महाविकास आघाडीच्या मेळाव्यात दिसल्या तर त्यांचे फोटो काढून आम्हाला द्या, आम्ही त्यांची व्यवस्था करतो". त्यांच्या या वक्तव्यावर विरोधकही जोरदार टीका करतांना पाहायला मिळत आहेत.
खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत म्हंटले आहे की, 'भाजप नेते खासदार धनंजय महाडिक यांचे महिलांबाबत केलेले वक्तव्य अत्यंत अपमानास्पद आहे. महिला सक्षमीकरणाची ही पद्धत भाजपची लोकशाही व्यवस्थेकडे असलेली विचारसरणी सिद्ध करण्यासाठी पुरेशी आहे. भाजप नेत्यांचे हे विधान लोकशाही आणि संविधानाच्या विरोधात आहे. कोणत्या पक्षाच्या रॅलीत नागरिकांनी सहभागी व्हावे, असा त्यांचा प्रश्न आहे. यासाठी कोणी कोणावर जबरदस्ती करू शकत नाही. या विधानाची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घ्यावी.
कॉंग्रेस नेत्यांची प्रतिक्रया
धनंजय महाडिक यांच्या वक्तव्याचा काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी तीव्र शब्दात निषेध केला. ते म्हणाले की, धनंजय महाडिक हे महिलांबद्दल अपमानास्पद वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. गेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी आमदार जयश्री जाधव यांचा अपमान केला होता. आता ते खालच्या पातळीला जाऊन धमकीची भाषा वापरतात. हे सर्व महाराष्ट्रातील महिलांसाठी आहे का? सतेज पाटील यांच्या मते धनंजय महाडिक यांचे हे वक्तव्य म्हणजे महिला स्वातंत्र्यावर घाला आहे.
धनंजय महाडिकांचं स्पष्टीकरण
धनंजय महाडिक यांनीही या प्रकरणाला वेग आल्याचे पाहून स्पष्टीकरण दिले आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भातील माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे. काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांना आता बोलण्यासारखं काहीच मुद्दे राहिलेलं नाहीत. म्हणून ते गैरसमज पसरवत आहेत. ज्या महिला काँग्रेसच्या रॅलीमध्ये सहभागी होतील त्यांचे फोटो काढून पाठवा त्यांचे व्यवस्था आपण करू असं मी म्हणालो. कदाचित अशा महिलांना लाडका बहीण योजनेचे लाभ मिळाले नसतील. त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी मी हे वक्तव्य केलं होतं, असं धनंजय महाडिक म्हणालेत.
सर्वप्रथम माझ्या वक्तव्याने कुठल्याही माता भगिनींचे मन दुखावले असेल तर त्यांची मी बिनशर्त माफी मागतो. pic.twitter.com/OQGxSjYcLy
— Dhananjay Mahadik (@dbmahadik) November 9, 2024