Home > Political > ग्रामपंचात निवडणूका बिनवीरोध करा आणि 21 लाखांचा विकासनिधी मिळवा

ग्रामपंचात निवडणूका बिनवीरोध करा आणि 21 लाखांचा विकासनिधी मिळवा

"ग्रामपंचात निवडणूका बिनवीरोध करा आणि 21 लाखांचा विकासनिधी मिळवा" असे आवाहन आमदार श्वेता महाले यांनी केलं आहे..

ग्रामपंचात निवडणूका बिनवीरोध करा आणि 21 लाखांचा विकासनिधी मिळवा
X

ग्रामपंचायत निवडणूक म्हटलं की गावातील वाद, भांडण तंटे आलेच. यात काही वेळा दोन सख्खा भाऊ पक्का वैरी सुध्दा बनतो. या निवडणूकांमध्ये राजकारणात नात्यांचा बळी जाऊनये म्हणून चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांनी 'ग्रामपंचायत निवडणूका बिनविरोध करा आणि 21 लाखांच्या विकासकामांसाठी निधी मिळवा' अशी घोषणा केली आहे.

या संदर्भात आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी "निवडणूका बिनविरोध झाल्याने शासनाकडून मिळणारे बक्षीस वेगळे. मी घोषित केलेले 21 लाख रुपयांचा अभिसरणात समावेश केला तर गावच्या विकासासाठी दुप्पट निधी उपलब्ध होईल ज्यातून गावातील नागरिक सांगतील ती विकासाची कामे मार्गी लावता येतील. अधिकाधिक ग्रामपंचायत बिनविरोध निघाव्यात यासाठी आमदार म्हणून हा माझा छोटासा प्रयत्न आहे." अशी प्रतिक्रीया दिली आहे.

Updated : 19 Dec 2020 12:00 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top