'एकही मोर सापडला नाही', म्हणून हेमा मालनी अधिकाऱ्यांवर संतापल्या
X
मुंबई: उत्तर प्रदेशाच्या वृंदावन येथील मोर संवर्धन केंद्रात पाहणीसाठी गेलेल्या खासदार हेमा मालिनी अधिकाऱ्यांवर चांगल्याच भडकल्या. पाहणीसाठी आलेल्या हेमा मालनी यांना केंद्रात एकही मोर दिसला नसल्याने, त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलच झापलं. यावेळी हेमा यांनी केलेल्या प्रश्नाची उत्तर सुद्धा अधिकाऱ्यांना देता आले नाही.
झालं असं की, वृक्षारोपणातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यासाठी खासदार हेमा मालिनी मोर संवर्धन केंद्रात गेल्या होत्या. राज्य सरकारच्या वृक्षारोपण मोहिमे अंतर्गत शनिवारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हेमा यांनी मोर संरक्षण केंद्रात झाडे लावली. तसेच मोर संवर्धन केंद्राची पाहणी सुद्धा केली.
मात्र, संपूर्ण पाहणीदरम्यान त्यांना केंद्रात एकही मोर आढळून आला नाही. त्यामुळे त्यांनी उपस्थितीत अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली, मात्र अधिकाऱ्यांना कोणतेच उत्तर देता आले नाही.
विशेष म्हणजे, मोर संवर्धन केंद्राच्या कामासाठी वनविभागाने मोठी रक्कम खर्च केली आहे. तसेच दोन वर्षांपूर्वी केंद्राच्या सुरक्षा भिंतीवरही कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले आहेत, परंतु मोर संवर्धनासाठी या केंद्रावर योग्य व्यवस्था नसल्याचं समोर आले. त्यात एवढ खर्च करूनही एकही मोर नसल्याचे हेमा मालनी चांगल्याच संतापल्या.