Home > आध्यात्मिक वाचनातून केला राजकारणाला राम राम, पत्नीच्या हाती सोपवली धूरा

आध्यात्मिक वाचनातून केला राजकारणाला राम राम, पत्नीच्या हाती सोपवली धूरा

आध्यात्मिक वाचनातून केला राजकारणाला राम राम, पत्नीच्या हाती सोपवली धूरा
X

औरंगाबादमधील कन्नड चे माजी आमदार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danave) यांचे जावई हर्षवर्धन जाधव (Harshavardhan Jadhav) यांनी राजकारणातून तडकाफडकी निवृत्ती घेतली आहे. त्यांची उत्तराधिकारी म्हणून त्यांच्या सौभाग्यवती संजना जाधव (Sanjana) या राजकीय धूरा सांभाळतील असं निर्णय त्यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून जाहीर केलाय.

हे ही वाचा..

दानवे आणि जाधव कुटुंबातील वादविवाद नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. संजय जाधव यांच्या आध्यात्मिक उपरतीतून तडकाफडकी घेतलेल्या राजकीय निवृत्तीमुळे सर्वांनाच आश्चर्य़ाचा धक्का बसला आहे.

संजय जाधव यांनी निवृत्ती घोषित करताना म्हटलंय की,

“लॉकडाऊन सुरु आहे आणि आपण आपले छंद जोपासतोय. मीही माझा अध्यात्मिक वाचनाचा छंद जोपासला आहे. आपण ज्या गोष्टींसाठी विनाकारण पळत राहतो त्या कितपत खऱ्या आहेत याची जाणीव मला झाली. म्हणून मी निर्णय घेतला की राजकारणातून निवृत्ती घ्यावी. माझ्या राजकारणाची उत्तराधिकारी ही सौभाग्यवती संजना जाधव असेल आणि आपल्यासा जेही प्रश्न असतील ते संजनाकडून सोडवून घ्यावेत”

https://www.facebook.com/rnonewsonline/videos/185451979344555/?t=9

  • घरगुती कलह

दोन महिन्यांपुर्वी हर्षवर्धन जाधव यांच्या आईने सुनेविरुद्ध, म्हणजेच रावसाहेब दानवे यांच्या मुलीविरुद्ध क्रांतीचौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत त्यांची सून संजना यांनी शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिल्याचे म्हटले आहे.

हर्षवर्धन जाधव यांनी यापुर्वी रावसाहेब दानवे यांच्यावर कन्नड पंचायत समितीतील त्यांचे सदस्य फोडल्याचा आरोप केला होता.

  • राजकीय कारकीर्द

-हर्षवर्धन जाधव हे 2009 मध्ये मनसेच्या तिकिटावर कन्नड विधानसभा निवडणुकीत निवडून आले होते.

-मात्र पाच वर्षांच्या आत त्यांनी पक्षांतर्गत मतभेदामुळे मनसेला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

-2019 च्या लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. मात्र त्यांचा पराभव झाला.

-2019 च्या विधानसभा निवडणुकीतही हर्षवर्धन जाधव यांना विजय मिळवता आला नाही. शिवसेनेच्या उदयसिंग राजपूत यांनी त्यांचा पराभव केला.

  • हे ही पाहा...

Updated : 23 May 2020 5:40 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top