‘४० पेक्षा अधिक ट्रेन रस्ता चुकल्या त्यावर रेल्वेमंत्री काहीच बोलले नाहीत?’
X
मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थलांतरीत प्रवासींसाठी अतिरिक्त रेल्वेंची मागणी केल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारमधील वाद पुन्हा उफाळून आला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मागणीवर आक्रमक पवित्रा घेत केंद्रिय रेल्वेमंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी एका तासात प्रवाशांची यादी पाठवा २४ तासात १२५ रेल्वे देतो असं आश्वासन देत उद्धव ठाकरेंना अडचमीत आणण्याचा प्रयत्न केला.
हे ही वाचा...
- युपीत १० लाख कोरोनाबाधित आहेत का? प्रियांका गांधींचा योगींना सवाल
- महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणार?
- भाजप आपल्या पापांनीच मरत आहे, रुपाली पाटील यांचा आक्रमक टोला
यावर शिवसेना पक्षाच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी नाराजी व्यक्त करताना राजकारण एका बाजुला ठेवा आणि श्रमिकांना घरी पोहोचवण्याची जबाबदारी पुर्ण करा अशी मागणी केली.
“राज्यातून स्थलांतरीत प्रवाशांच्या ४० पेक्षा अधिक ट्रेन रस्ता चुकल्या आहेत. मुंबईतून निघालेल्या रेल्वे पोहोचण्यास ४ दिवस लागत आहे. प्रवासात न स्वच्छता आहे किंवा खाण्याची सोय या सर्व विषयांवर रेल्वेमंत्री पियुष गोयल शांत राहिले. पण जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जास्त रेल्वेंची मागणी केली तेव्हा रात्रीच्या वेळी अर्ध्या तासात १२५ रेल्वे देतो म्हणत प्रवासींची यादी मागितली.“ असं प्रियांका चतुर्वेदी यांनी म्हटलं आहे.
https://www.facebook.com/PriyankaChaturvediParivar/videos/172397304212031/?t=0