Home > Political > कार्यक्रमात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांचे स्पष्टीकरण

कार्यक्रमात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांचे स्पष्टीकरण

कार्यक्रमात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांचे स्पष्टीकरण
X

मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावातील एका कार्यक्रमात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. काही माध्यमातून देखील ही बातमी प्रसिध्द करण्यात आली. या वक्तव्यावरून मंत्री गुलाबराव पाटील यांनी आता स्पष्टीकरण दिले आहे. 'स्त्रीरोग तज्ञ हे कधीच हातपाय बघत नाहीत. हातपाय बघणारे कधीच स्त्री रोगतज्ञ होऊ शकत नाही' असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावमधील एका कार्यक्रमांमध्ये केलं असल्याचं समाजमाध्यमांवर व्हयरल झाले आहे.

या वक्तव्य वरून शिवसेनेच्या वतीने सोमवारी जळगाव महापालिकेसमोर मंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिमा जाळण्यात आली व प्रचंड घोषणाबाजी करत गुलाबराव पाटील यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. मात्र माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आल्याच स्पष्टीकरण मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे. हे आंदोलन हास्यास्पद आहे. चुकीचा अर्थ काढून आंदोलन करण्यात आल्याचं मंत्री पाटील म्हणाले.

तसेच याबाबतचे वृत्त ज्या वृत्त वाहिनीने प्रसारित केले, त्या वृत्त वाहिनीवर हक्क भंग केल्या बाबतचा प्रस्ताव दाखल करणार असल्याचं मंत्री गुलाबराव पाटील यांनी बोलताना सांगितलं. मी कोणी डॉक्टर बाबत बोललो नाही. वृत्त वहिनीने तपासून बातम्या केल्या पाहिजेत जेणेकरून कोणाचे करिअर बरबाद होणार नाही अशी खंत ही मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली.

आजही एका कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील यांनी आम्ही 50 खोके एकदम ओके आहोत असं वक्तव्य केलं होत. या वक्तव्याबाबतही मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, सर्व बाजूने आमच्यावर टीका होत आहे. आमच्या बदनाम्या करण्यात येत आहेत. त्यामुळे मी सहजच ५० खोके तर खोके असे बोललो ज्यावेळी संजय राऊत यांच्या वेळी आम्ही मतदान केलं होत तर त्यावेळी आम्ही पैसे घेतले होते का? असा सवालही मंत्री पाटील यांनी उपस्थित केला.आम्ही केवळ मतदान केल, तरीही आमच्यावर आरोप करत असाल तर मी बोललो पन्नास खोके तर खोके मात्र याचा दुसरा अर्थ काढण्यात आल्याचे हे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

Updated : 30 Aug 2022 12:30 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top