ग्राम पंचायत निवडणूक : बलात्काराचा आरोप झालेल्या धनंजय मुंडे यांच्या परळीचा निकाल काय सांगतो?
X
बलात्काराच्या आरोपाने बॅकफूटवर गेलेले सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे ग्रामपंचायत निवडणुकीतील वर्चस्व दिसून आलं आहे. परळी मतदारसंघातील परळी तालुक्यातील 8 पैकी 6 ग्रामपंचायतींवर धनंजय मुंडे यांच्या गटाने राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला आहे.
हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. परळी तालुक्यातील 8 पैकी वंजारवाडी, रेवली, सरफराजपूर, मोहा, गडदेवाडी, लाडझरी या 6 ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे. परळी तालुक्यातील रेवली आणि वंजारवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली होती. या दोन्ही ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे गेल्या होत्या. भोपळा ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच्या गटाने विजय मिळवला आहे.
मुंबईतील महिलेने केलेल्या बलात्काराच्या आरोपानंतर धनंजय मुंडे हे अडचणीत सापडले आहेत. अशावेळी मुंडे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या परळीत नेमकं काय होतं, याची राज्यभर चर्चा होती. मात्र परळीतील जनतेने ग्रामपंचायत निवडणुकीत धनंजय मुंडे यांच्या बाजूनेच कौल दिला आहे.