Home > ‘हिजडा शब्द मागे घ्या नाहीतर योग्य ठिकाणी बाजार उठवला जाईल’

‘हिजडा शब्द मागे घ्या नाहीतर योग्य ठिकाणी बाजार उठवला जाईल’

‘हिजडा शब्द मागे घ्या नाहीतर योग्य ठिकाणी बाजार उठवला जाईल’
X

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे य़ांचे पुत्र आक्षेपार्ह ट्वीटमुळे राजकीय नेत्यांच्या निशाण्यावर येण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांच्या अतिशय खालच्य़ा पातळीवर जाऊन टीका केल्याचं बोलंलं जातंय. निलेश राणे यांनी तनपुरे यांना हिजडा म्हणून संबोधलं आहे. त्य़ामुळे एका नवीन वादाला तोंड फुटलं आहे.

हे ही वाचा...

प्राजक्त तनपुरे यांना हिजडा असं संबोधन्यावरुन तृतीयपंथीय सारंग पुनेकर (Sarang Punekar) यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सोबतच शब्द मागे घ्य़ा नाहीतर योग्य़ ठिकाणी बाजार उठवला जाईल अशा इशाराही दिला आहे.

जर हिजडा शब्दाचा अर्थ माहीत नसेल इतिहास माहीत नसेल तर मी सांगते पण आपली बालिश बुद्धी जगाला दाखवू नका, जेंव्हा नाकात वेसण नसलेलं हलगट सैरावैरा पळत ना तशीच काही तुमची गत झालीये, तोंडाला आळा घाला हिजडा शब्द काढा नाहीतर योग्य तिथे बाजार उठवला जाईल.”

सारंग यांच्या या उत्तराला सोशल मीडियावर अनेकांनी पाठींबा दर्शवला असून निलेश राणे यांनी या ट्वीटबद्दल माफी मागावी अशी मागणी केली आहे.

निलेश राणे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याविरोधातील ट्वीट नेहमीच चर्चेत असतात. अर्थातच सोशल मीडियाच्या माध्यामातून शिवसैनिक राणे यांचा चांगलाचं समाचार घेतात. मात्र, उद्धव ठाकरेंकडून त्यांना फारसे महत्त्व दिले जात नाही.

काही दिवसांपुर्वी साखर उद्योगाला वाचवण्यासाठी शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोदींना लिहलेल्या पत्रावर निलेश राणे यांनी टीकात्मक ट्वीट केलं होतं. यावर आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी निलेश राणे यांच्या ट्वीटला दिलेल्या उत्तर फारचं चर्चेत राहिलं होतं.

Updated : 21 May 2020 2:33 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top