Home > Political > सक्षणा सलगर यांच्यासाठी चित्रा वाघ आल्या धावून, पण सुप्रिया सुळेंची चुप्पी

सक्षणा सलगर यांच्यासाठी चित्रा वाघ आल्या धावून, पण सुप्रिया सुळेंची चुप्पी

सक्षणा सलगर यांच्यासाठी चित्रा वाघ आल्या धावून, पण सुप्रिया सुळेंची चुप्पी
X

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांना धमकीचा फोन आला असून,"तुझी इज्जत लुटतो" अशी धमकी फोनवरून देण्यात आली आहे. याप्रकरणी उस्मानाबाद जिल्ह्यातील टोकी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र यावेळी सक्षणा सलगर यांच्यासाठी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ धावून आल्या तर, राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळेंनी मात्र चुप्पी साधली असल्याचा पाहायला मिळालं.

दोन दिवसांपूर्वी सलगर यांनी ट्विट करत म्हंटलं होत की,'मला आज सायंकाळी 06:14 वा. 99 223 * या नंबरवरून फोन कॉल आला होता. ही व्यक्ती माझी इज्जत लुटण्याची भाषा करत होती. आ.गोपीचंद पडळकर यांचा तो कार्यकर्ता आहे, असे तो सांगत होता, असं सलगर यांनी ट्विट केलं होतं.






त्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या घटनेचा निषेध करत, 'मी तुझ्या सोबत आहे, अशा पद्धतीत कुणीही महिला/मुलीला धमकावू शकत नाही आणि जो हे करेल त्याला आम्ही सोडणार नाही, असे म्हणत चित्रा वाघ सलगर यांच्यासाठी धावून आल्या.




मात्र, भाजपच्या नेत्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षाच्या मदतीला धावून येत असताना, राष्ट्रवादीच्या महत्वाच्या नेत्या समजल्या जाणाऱ्या सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटर एक ओळ सुद्धा लिहली नसल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर राष्ट्रवादीच्या महिला आघाडीत याची चर्चा पाहायला मिळत आहे.


यावर बोलताना, सक्षणा सलगर म्हणाल्यात की, पडळकर यांना फक्त शरद पवार यांच्यावर बोलण्यासाठी नियुक्ती केलं आहे का? असा प्रश्न पडतो. ते धनगर समाजाच्या प्रश्नावर काही बोलत नाही. मी माझे मत मांडले म्हणून त्यांचे कार्यकर्ते मला फोन करून धमकी देतात. पण आमच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी मला फोन करून घाबरण्याचे कारण नाही असे सांगत धीर दिला. त्यामुळे अशा आशा धमक्या देणाऱ्या लोकांना मी घाबरणारी नाही, असंही सलगर म्हणाल्या

Updated : 2 Sept 2021 3:53 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top