Home > दानवेंच्या मुलीने दिली सासूला ठार मारण्याची धमकी

दानवेंच्या मुलीने दिली सासूला ठार मारण्याची धमकी

दानवेंच्या मुलीने दिली सासूला ठार मारण्याची धमकी
X

भाजप खासदार रावसाहेब दानवे (Ravsaheb Danave) आपल्या मुलीच्या घरगुती वादातून पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या आईने सुनेविरुद्ध, म्हणजेच रावसाहेब दानवे यांच्या मुलीविरुद्ध क्रांतीचौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत त्यांची सून संजना यांनी शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिल्याचे म्हटले आहे.

हे ही वाचा...

कन्नड येथील माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा विवाह केंद्रीय राज्यमंत्री व भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांची मुलगी संजना यांच्यासोबत झालेला आहे. जाधव व दानवे या दोन कुटुंबीयांत यापूर्वी कलह झालेला होता. वैयक्तिक पातळीवर हर्षवर्धन जाधव व रावसाहेब दानवे यांच्यातील संबंधही बरेच बिघडले होते. हर्षवर्धन यांनी यापुर्वी दानवे यांच्यावर कन्नड पंचायत समितीतील त्यांचे सदस्य फोडल्याचा आरोप केला होता.

Updated : 13 March 2020 9:06 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top