Home > मोदी-योगींवर अभद्र टीका करणाऱ्या अलका लांबांवर गुन्हा दाखल

मोदी-योगींवर अभद्र टीका करणाऱ्या अलका लांबांवर गुन्हा दाखल

मोदी-योगींवर अभद्र टीका करणाऱ्या अलका लांबांवर गुन्हा दाखल
X

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) , उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Aadityanath) आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर आक्षेपार्ह टीपण्णी करण्यावरुन कॉंग्रेस नेत्या अलका लांबा (Alka Lamba) यांच्याविरोधात हजरतगंज ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश बाल अधिकार सरंक्षण आयोगाच्या सदस्या प्रीती वर्मा यांनी ही तक्रार दाखल केली आहे.

हे ही वाचा...

प्रीती वर्मा यांनी तक्रारीत म्हटलं आहे की, “अलका लांबा यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरुन असा व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्यात त्यांनी नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर अपमानजनक शब्दांचा वापर केला आहे. तसेच आपत्तीजनक आरोपांसह हायकोर्टाच्या न्यायाधीशांच्या प्रतिष्ठेवरही प्रश्न उपस्थित केला आहे.”

संबंधित व्हिडीओमध्ये दोन वर्षापुर्वी अलका लांबा यांनी उन्नाव बलात्कार आणि हत्या प्रकरणावर आपल्या प्रखर भावना व्यक्त केल्या होत्या. यावेळी त्यांनी मोदी, योगी आणि शाह यांच्यावर गंभीर टीका केली होती. ज्या प्रकरणात भाजप आमदार कुलदिप सेंगर (Kuldeep Sengar) दोषी आढळले असून सध्य़ा ते या गुन्ह्याची शिक्षा भोगत आहेत.

अलका लांबा यांनी संबंधित व्हिडीओवर स्पष्टीकरण देताना म्हटलंय की, “हा व्हिडीओ साधारण दोन वर्षापुर्वी अपलोड केला होता जो आतापर्यंत १ करोड लोकांनी पाहीला आहे. अधभक्तांना माझ्याविरोधात काही मिळालं नाही म्हणून आता हा दोन वर्ष जुना व्हिडीओ FIR करण्यासाठी शोधून काढला आहे. पण दोन वर्षांनंतरही मी माझ्या वक्तव्यांवर कायम आहे.”

अलका लांबा यांनी त्यांच्याविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून ट्वीट केलं आहे. “FIR ची भीती वाटत नाही, तुरुंगात जाण्याचीही भीती वाटत नाही. बलात्कारी बेलवर बाहेर येईल आणि शक्य आहे की मी तुरुंगात जाईन. मी घाबरले असं त्यादिवशी समजा, जेव्हा देशात पीडित मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवणं सोडून देईन. हा आवाज फक्त देवाघरी गेल्यानंतर एकदाच शांत होईल.”

Updated : 26 May 2020 6:18 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top