प्रसिद्ध गायक व काँग्रेसचे नेते सिद्धू मूसेवाला यांची भर दिवस हत्या.. | Sidhu Moose Wala Shot Dead
X
प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांची भरदिवसा हत्या करण्यात आली आहे. मानसाच्या जवाहरके गावात त्यांच्यावर भीषण गोळीबार झाला. या गोळीबारात मुसेवाला यांना प्राण गमवावे लागला आहे तर त्यांचे दोन साथीदार जखमी झाले आहेत. पंजाबमध्ये मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील आप सरकारने शनिवारीच सिद्धू मुसेवाला यांची सुरक्षा कमी केली होती.
मुसेवाला यांच्याकडे पूर्वी 8 ते 10 बंदूकधारी होते. माण सरकारने ते काही दिवसांपूर्वी ते 2 बंदूकधारी केले होते. प्राथमिक माहितीनुसार, सिद्धू मूसेवाला आपल्या साथीदारांसह कारमधून जात होते. काळ्या रंगाच्या कारमध्ये आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. घरापासून ५ किमी अंतरावर गेल्यावरच मुसेवाला यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यावेळी मुसेवाला स्वतः महिंद्रा थार हे वाहन चालवत होते.
विजय सिंगला यांच्या विरोधात काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती.
सिद्धू मुसेवाला यांनी पंजाब विधानसभेची निवडणूक मानसा मतदारसंघातून आम आदमी पक्षाच्या डॉ. विजय सिंगला यांच्या विरोधात काँग्रेसच्या तिकिटावर लढवली होती. मुसेवाला यांचा पराभव झाला आणि त्यांचा पराभव करणारे विजय सिंगला राज्याचे आरोग्यमंत्री झाले. नुकतेच मुख्यमंत्री भगवंत मान यांनी त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून पदावरून हटवले होते.
काल वकिलाला फोन करून जीवाला धोका असल्याचे सांगितले होते.
सिद्धू मुसेवाला यांनी कालच त्यांच्या वकिलाशी चर्चा केली. ज्यामध्ये त्याने जीवाला धोका असल्याचे सांगितले होते. मुसेवाला म्हणाले होते की, पंजाब सरकारने त्यांना कोणतीही सूचना न देता त्यांची सुरक्षा अचानक कमी केली होती.