EVM भाजपच्या गाडीतच का आढळते, प्रियंका गांधींचा सवाल...
X
आसाममध्ये दुसऱ्या टप्प्यातील 39 जागांसाठी 1 एप्रिलला मतदान पार पडलं. त्यानंतर भाजप उमेदवाराच्या गाडीत एक EVM मशीन electronic voting machines आढळल्याचा धक्कादाय व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भाजपचे पथरकंडी चे Patharkandi उमेदवार क्रिष्णेंदू पॉल Krishnendu Paul यांच्या गाडीत हे EVM आढळलं आहे.
या संदर्भात एका पत्रकाराने व्हीडीओ ट्विट केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये पथरकंडी येथील परिस्थिती चिंताजनक असल्याचं म्हटलं आहे.
यावर प्रियंका गांधी यांनी ट्वीट केलं असून प्रत्येक वेळेस खाजगी गाडीतून EVM नेत असल्याचे व्हिडीओ समोर येत आहेत. त्यामध्ये काही गोष्टी कॉमन आहेत. या खाजगी गाड्या भाजप उमेदवारांच्या किंवा त्यांच्या सहकाऱ्यांच्या असतात. व्हिडीओला एक घटना दाखवून निष्कासीत केलं जातं. भाजप आपल्या माध्यमं तंत्राचा वापर ज्या लोकांनी ही घटना समोर आणली. त्यांच्यावर आरोप करण्यासाठी करते. आत्तापर्यंत असे अनेक प्रकरण समोरं आली आहेत. मात्र, त्यावर आत्तापर्यंत काहीही झालेलं नाही. निवडणूक आयोगाकडे होणाऱ्या तक्रारी आणि EVM शी जोडलेल्या प्रकरणाचे पुनर्मूल्यांकन होणं गरजेचं आहे. सर्व राष्ट्रीय पक्षांनी यावर लक्ष देणं गरजेचं असल्याचं मत प्रियंका गांधी यांनी व्यक्त केलं आहे.
क्या स्क्रिप्ट है?
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) April 2, 2021
चुनाव आयोग की गाड़ी खराब हुई, तभी वहां एक गाड़ी प्रकट हुई। गाड़ी भाजपा के प्रत्याशी की निकली। मासूम चुनाव आयोग उसमें बैठ कर सवारी करता रहा।
प्रिय EC, माजरा क्या है? आप देश को इस पर कुछ सफाई दे सकते हैं? या हम सब मिलकर बोलें EC की निष्पक्षता को वनक्कम? pic.twitter.com/LcQ4nFE3Xi
दरम्यान विरोधी पक्षांच्या या टिकेनंतर निवडणूक आयोगाने चार निवडणूक अधिकाऱ्यांना निलंबीत केलं असून ज्या मतदान केंद्रावर हा प्रकार घडला त्या ठिकाणी पुन्हा एकदा मतदान घेण्याचे सांगितले आहे. आणि या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. निलंबीत अधिकाऱ्यांनी आम्ही पथरकंडीचे नाहीत. आम्ही EVM घेऊन जात असताना आमची गाडी खराब झाली. या गाडीने आम्हाला मदत देऊ केली. आम्ही उमेदवार क्रिष्णेंदू पॉल ला ओळखत नाही. असा अजब खुलासा निवडणूक अधिकाऱ्यांनी केला आहे.