प्रियांका गांधी मुंबईत, नक्की काय घडलं..
X
महाविकास आघाडीचे अस्तित्व धोक्यात आले असताना. शिवसेने सोबत असलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी सुद्धा धसका घेतला आहे. हे सगळे घडत असताना आज काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी मुंबई विमानतळावर राज्यातील काँग्रेस नेत्यांची भेट घेतली असल्याचे समजत आहे.
शिवसेनेचे (Shivsena )एकनिष्ठ मंत्री म्हणून प्रतिमा असलेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पक्षातील नाराज आमदारांना घेऊन बंड केले आहे. त्यामुळे भाजपच्या राजकारणाला उत्तर म्हणून निर्माण झालेले महाविकास आघाडी सरकार कोसळणार हे निश्चित झाले आहे. शिवसेनेचे आमदार एवढ्या मोठ्या प्रमाणात फोडण्यात एकनाथ शिंदे यांना एकट्याला यश आले का, अशी सुद्धा चर्चा सुरू झाली आहे. या सगळ्या प्रकारानंतर उद्धव ठाकरे यांनी काल संध्याकाळी शासकीय निवासस्थान असलेले वर्षा निवासस्थान देखील सोडले आहे.
महाराष्ट्रात हे सगळं होत असताना काँग्रेस मध्ये सुद्धा अंतर्गत धुसमुस सुरू आल्याच दिसत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे दिल्लीतील मोठे नेते कामालनाथ सध्या मुंबईमध्ये या सर्व घटनांचा आढावा घेत आहेत. त्यांनी काल सर्व आमदारांची सुद्धा बैठक घेतली. याच पार्श्वभूमीवर आज कंग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी या मुंबईत आल्या होत्या. त्यामुळे नक्की आता पुढे काय घडणार? अशी चर्चा सुरू झाली होती. पण त्या मुंबईत खासगी कार्यक्रमासाठी आल्या असल्याचं म्हंटल जात आहे. त्यांनी मुंबई विमानतळावरचा राज्यातील काँग्रेस नेत्यांची भेट घेतली व राज्यातील घडामोडींचा आढावा घेतल्यानंतर त्या पुढील नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाल्या आहेत.