Home > Political > ''धमक्यांना भीक घालत नाही..'' एकनाथ शिंदेंचे शरद पवारांना उत्तर..

''धमक्यांना भीक घालत नाही..'' एकनाथ शिंदेंचे शरद पवारांना उत्तर..

शरद पवार यांच्या या इशाऱ्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत असल्या धमक्यांना भीक घालत नसल्याचं म्हंटल आहे. शरद पवार यांनी शिवसेनेचे बंडखोर आमदारांनी घेतलेला निर्णय अँटी डिफेक्शन कायद्याच्या विरोधात आहे. त्यामुळे त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील असं म्हटलं होतं.

धमक्यांना भीक घालत नाही.. एकनाथ शिंदेंचे शरद पवारांना उत्तर..
X

एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या चाळीसच्यावर आमदारांनी बंड केल्यानंतर सरकारकडे बहुमत नसल्याचे सांगितले जाते आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत ४०पेक्षा जास्त आमदार असल्याचा दावा केला आहे. राज्यात चाललेल्या या घडामोडींवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज एक प्रेस कॉन्फरन्स घेतली या प्रेस कॉन्फरन्स मध्ये बोलताना त्यांनी 'अडीच वर्ष महाविकास आघाडीने उत्तम काम केलं आहे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. कोरोनाच्या राष्ट्रीय संकटावर मात करण्याचं काम केलं. हे सर्व पाहिल्यानंतर महाविकास आघाडीचा प्रयोग फसला असं म्हणणं राजकीय अज्ञान आहे. बंडखोर आमदारांना इथे यावंच लागेल राज्यपालांपुढे यावं लागेल. किंवा विधानसभेत तरी यावं लागेल. विधानसभेच्या प्रांगणात आल्यावर आसाम किंवा गुजरातचे नेते त्यांना मार्गदर्शन करतील असं वाटत नाही. बंडखोर आमदारांना किंमत मोजावी लागेल'' असा इशारा त्यांनी दिला होता.

आता शरद पवार यांच्या या इशाऱ्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत असल्या धमक्यांना भीक घालत नसल्याचं म्हंटल आहे. शरद पवार यांनी शिवसेनेचे बंडखोर आमदारांनी घेतलेला निर्णय अँटी डिफेक्शन कायद्याच्या विरोधात आहे. त्यामुळे त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील असं म्हटलं होतं. त्यांच्या या टीकेला त्यांनी ट्विटरवर ट्विट करत उत्तर दिला आहे, त्यांनी म्हंटले आहे की, "कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय? तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो! घटनेच्या 10 व्या परिशिष्टाप्रमाणे (शेड्युल) व्हीप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही.यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल आहेत. 12 आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला अजिबात घाबरवू शकत नाही. कारण आम्हीच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना व शिवसैनिक आहोत. कायदाही जाणतो, त्यामुळे असल्या धमक्यांना भीक घालत नाही. तुम्ही संख्या नसताना अवैध गट तयार केला म्हणून तुमच्यावरच कारवाईची आमची मागणी आहे."

Updated : 24 Jun 2022 12:16 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top