Home > Political > "शिवजयंतीला बाईक रॅली, मिरवणुका न काढता, आरोग्य शिबिरे घ्या"

"शिवजयंतीला बाईक रॅली, मिरवणुका न काढता, आरोग्य शिबिरे घ्या"

IPS मोक्षदा पाटील यांचे औरंगाबादकरांना आवाहन

शिवजयंतीला बाईक रॅली, मिरवणुका न काढता, आरोग्य शिबिरे घ्या
X

शासनाने राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येवर चिंता व्यक्त करत राज्यातील काही भागात पुन्हा निर्बंधही लागे केले. खबरदारीचा उपाय म्हणून शिवजयंतीच्या दिवशी गर्दी न करण्याचं आवाहन प्रशासनाकडून देण्यात येतय. असंच आवाहन औरंगाबाद ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनीही केलं आहे.

काय आहे मोक्षदा पाटील यांचं आवाहन..?

"औरंगाबाद ग्रामीण जिल्ह्यातील सर्व जनतेस आवाहन करण्यात येते की, यावर्षी दिनांक 19/02/2021 रोजी साजऱ्या होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव शासन निर्देशाप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम अथवा प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका न काढता त्याऐवजी आरोग्य विषयक उपक्रम, शिबिरे जसे रक्तदान कोरोनासंबंधी जनजागृतीपर प्रतिबंधात्मक उपाय योजना, स्वच्छता इत्यादीचे आयोजन करून साध्या पद्धतीने साजरा करावा. ज्यात कमीत कमी व्यक्ती मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास/प्रतिमेस सामाजिक अंतर राखून, मास्क इत्यादीचे पालन करून पुष्पहार अर्पण/अभिवादन करावे व covid-19 संबंधाने निर्गमित केलेल्या निर्देशाचे व जिल्हाधिकारी औरंगाबाद यांचे जमाव बंदी आदेशाचे पालन करावे."

Updated : 18 Feb 2021 11:00 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top