Home > Political > महिला राहूल गांधींवर भाळतात का?

महिला राहूल गांधींवर भाळतात का?

महिला राहूल गांधींवर भाळतात का?
X

ट्विटरवर एका महिलेने राहूल गांधी हे त्यांच्या लुक्स वरून त्यांचा २०२४ साठी पंतप्रधान म्हणून विचार करण्यास हरकत नाही असं म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांतील राहूल गांधींवर महिलांमुळे होणारी ट्रोलिंग पाहता महिला त्यांच्यावर भाळतात का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

राज्याच्या राजकारणात जे स्थान राज ठाकरेंचं आहे अगदी तेच स्थान राहूल गांधींचं आहे. या दोघांसाठीही कायम "आपण त्यांच्यावर प्रेम करू शकता, त्यांच्यावर रागावू शकता, पण त्यांना दुर्लक्षित नाही करू शकत" ही वाक्य वापरली जातात. ज्यात सत्यता देखील जाणवते. त्यामुळे कायमच ही दोनही मंडळी चर्चेत असतात. सध्या देखील दोघेही वेगवेगळ्या मुद्द्यांवरून चर्चेत आहेत. पण आज आपण राहूल गांधींबद्दल बोलणार आहोत. राहूल गांधीं गेल्या काही दिवसांपासून एका वेगळ्याच मुद्द्यावरून ट्रोल होतायत. राहूल गांधींचा फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आणि त्यांच्यावर पबमध्ये फिरत असल्याचे आरोप करत त्यांना ट्रोल केलं गेलं. पण खरं तर ते त्यांच्या मैत्रिणीच्या घरी लग्नासाठी गेले होते. या आधीही एका महिलेसोबत राहूल गांधींचं नाव जोडलं गेलं होतं.

प्रियदर्शनी या ट्विटर वापरकर्तीने तोट फोटो पोस्ट करत, "ज्या महिलांनी मोदींच्या 'पर्सनॅलिटी' वर भाळून त्यांना २०१४, २०१९ मध्ये मत दिलं, त्यांच्यासाठी अजून एक त्याहीपेक्षा भारी option आहे २०२४साठी." असं ट्विट केलं आहे. त्यांच्या या ट्विट वरून राहूल गांधींवर महिला भाळतात का हा प्रस्न सहज कुणालाही पडू शकतो.

यावर प्रज्वल पडोळे या वापरकर्त्याने, 'हमारा नेता हँजसम है' अशी प्रतिक्रीया प्रियदर्शनीच्या ट्विटला दिली आहे.

तर रेहने दे भाई या वापरकर्त्याने, " ह्या लॉजिकने अमित ठाकरे नगरसेवक होऊ शकतो", असं म्हटलं आहे.

तर त्यांच्या या ट्विटला प्रियदर्शनी यांनी "आरामात, असतील की त्याच्याही फॅन्स", अशी प्रतिक्रीया दिली आहे.

या ट्वीटलाच दिलेल्या एका प्रतिक्रीये मध्ये प्रियदर्शनी म्हणतात, "ही पोस्ट मोदी भक्त महिलांसाठी आहे"

राहूल गांधीवर महिला भाळोत किंवा नाही पण प्रत्येक राजकारणी नेत्याला त्याचं वैयक्तीक आयुष्य असतं आणि त्यात दखल देऊन मिठाचा खडा टाकणं कितपत योग्य आहे असा प्रश्न आपण प्रत्येकाने स्वतःला एकदातरी विचारला पाहिजे.

Updated : 6 May 2022 12:57 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top