दीपाली सय्यद यांचा संजय राऊत यांना सल्ला
शिवसेना पक्षात एकनाथ शिंदे यांच्या गटामुळे फूट पडली .राज्यात सत्तांतर झाले.पण एकत्र चर्चा करून मध्यस्थी करण्याचे प्रयत्न दीपाली सय्यद करताना दिसत आहेत .
X
महाराष्ट्रातील राजकीय सत्तानाट्यावर देशभरातून आजवर अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत .माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदाचा राजीनामा दिला त्यांनतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले.या सगळ्या घडामोडींविषयी जनतेतून प्रतिक्रिया तर आल्या आहे.दरम्यान दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली.या मुलाखतीचा एक भाग मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आला.जशी संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली तशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घ्यावी असे मत शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी व्यक्त केले आहे.
'मान अपमान यासारख्या गोष्टी सध्या प्रत्येकाच्या घराघरात घुसल्या आहेत, त्यामुळे आपलं घर वाचवण्यासाठी मनाला येईल ते बोलणं चालू आहे.पण जशी उद्धव ठाकरे
यांची मुलाखत संजय राऊत यांनी घेतली अगदी अशीच मुलाखत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांची घ्यावी'अशी इच्छा दीपाली सय्यद यांनी व्यक्त केली आहे.
त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या मनातील भावना मुलाखतीच्या माध्यमातून जशा बाहेर समाजासमोर आणल्या अगदी असाच प्रयत्न एकनाथ शिंदेंची मुलाखत घेऊन करता येईल असं त्या म्हणाल्या. आणि यातून काहीतरी चांगला मध्यस्थीचा मार्ग निघेल.असं मत शिवसेना नेते दिपाली सय्यद यांनी व्यक्त केलं आहे.
यासाठी आपण स्वतः संजय राऊत यांना भेटणार असल्याचे सुध्दा शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी म्हंटले आहे