Home > Political > "देवेंद्रजी खुर्चीसाठी हा माज बरा नव्हे.." दीपाली सय्यद यांची टीका

"देवेंद्रजी खुर्चीसाठी हा माज बरा नव्हे.." दीपाली सय्यद यांची टीका

देवेंद्रजी खुर्चीसाठी हा माज बरा नव्हे.. दीपाली सय्यद यांची टीका
X

देहूमध्ये काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमात बोलले. मात्र, तिथे अजित पवारांना बोलण्याची संधी मिळाली नाही. हा सगळा प्रकार घडल्यानंतर राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादीकडून या संपूर्ण प्रकारावर टीका केली जात आहे. आता या प्रकरणात शिवसेनेने सुद्धा उडी घेतली आहे शिवसेनेच्या नेत्या, अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी या प्रकरणावरून देवेंद्रजी खुर्चीसाठी हा माज बरा नव्हे असं म्हणत थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावरच निशाणा साधला आहे.

देहू येथे झालेल्या कार्यक्रमात घडलेल्या प्रकारानंतर दीपाली सय्यद यांनी आज एक ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, "देवेंद्रजींनी थेट देशाच्या पंतप्रधानांचे प्रोटोकॅाल तोडले. स्थानिक आमदार,खासदार,नगराध्यक्षांचे पासेस गायब केले.उपमुख्यमंत्र्यांचे नाव भाषणाच्या यादीतुन काढले.पक्षाच्या नेत्यांना व्यासपीठ आणि स्वागताला उभे केले. खुर्चीसाठी हा माज बरा नव्हे. देवेंद्र फडणवीसांची चौकशी व्हायालाच हवी. अशी टीका त्यांनी केली आहे."

या सगळ्या प्रकरणावर भाजपने काय म्हंटले आहे..

देहू येथील कार्यक्रमात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भाषण करू दिले. मात्र अजित पवार यांचे भाषण डावलण्यात आल्याने राष्ट्रवादीकडून संताप व्यक्त केला जात आहे. त्यापार्श्वभुमीवर भाजपने सोशल मीडियावर स्पष्टीकरण दिले आहे. भाजपने अजित पवार यांचे भाषण डावलण्यात आल्याच्या आरोपांना प्रत्युत्तर देतांना म्हटले आहे की, देहू येथील कार्यक्रम हा सरकारी नव्हता, तर खाजगी होता. प्रोटोकॉल हा सरकारी कार्यक्रमाला असतो, खाजगी कार्यक्रमाला नाही, असे भाजपने म्हटले आहे. तसेच स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करण्याची विनंती केली. पण त्यांनी नकार दिला. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्यातील एकच कार्यक्रम सरकारी होता, तो राजभवन येथील. तेथे प्रोटोकॉलप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाषण झाले. (येथे देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झालेले नाही, हे लक्षात घ्या) असेही भाजपने म्हटले आहे.

मुंबई समाचारचा कार्यक्रम खाजगी होता. तरीही तेथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाषण झाले. मात्र देवेंद्र फडणवीस यांचे नाही. याबरोबरच नरेंद्र मोदी यांच्या तीन कार्यक्रमांपैकी दोन कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांचे भाषण न होऊनही भाजपाकडून कोणताही आक्रस्ताळेपणा केला नाही. कारण भाजपासाठी वारकरी, स्वातंत्र्यसेनानींचे स्मारक, एका वृत्तपत्राची द्विशताब्दी हे विषय महत्त्वाचे आहेत, स्वत:चा अहंकार नाही. ही वस्तुस्थिती कळल्यानंतर सुद्धा ज्यांना केवळ गरळ ओकायची आहे, त्यांना महाराष्ट्राचा गौरव, महाराष्ट्राची परंपरा याच्याशी काही एक घेणं-देणं नाही. त्यांना केवळ तळ्या उचलायच्या आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या गरळ ओकण्यामागे मोदीद्वेष अधिक आहे. त्यामुळे त्यांना औषध नाही, असा टोला भाजपने लगावला आहे.

Updated : 16 Jun 2022 2:42 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top