Home > Political > गोव्यातील रेस्टॉरंट वादात स्मृती इराणीच्या मुलीला हायकोर्टाची क्लिनचीट .

गोव्यातील रेस्टॉरंट वादात स्मृती इराणीच्या मुलीला हायकोर्टाची क्लिनचीट .

गोव्यातील रेस्टॉरंट वादात स्मृती इराणीच्या मुलीला हायकोर्टाची क्लिनचीट .
X

झोईश इराणी ही गेल्या काही दिवसांपासून गोव्यातील एका बेकायदा रेस्टॉरंटच्या वादामुळे चर्चेत आली होती. गोमाता रक्षण करण्याचा दावा करणाऱ्या भाजर पक्षाच्या नेत्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची ही कन्या आहे.त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये गोमांस मिळत असल्याची बाब समोर आल्यानं यावरुन अनेकांनी स्मृती इराणीवर टीका केली. यावेळी स्मृती इराणी यांनी देखील आरोपा संदर्भातील लढाई न्यायालयात लढू असे सांगितले होते.

दिल्ली हायकोर्टानं इराणी आणि त्यांच्या मुलीला या प्रकरणात क्लीनचीट दिली आहे. इंडिया टुडेनं याबाबत वृत्त दिलं आहे. दिल्ली हायकोर्टानं आपल्या आदेशात म्हटलं की, "केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि त्यांची कन्या झोइश इराणी या दोघीही गोव्यातील रेस्टॉरंटच्या मालक नाहीत. या दोघींनी या रेस्टॉरंटच्या परवान्यासाठी कुठलाही अर्ज केलेला नाही, असं आमच्या निदर्शनास आलं आहे. हे रेस्टॉरंट किंवा त्याच्या जागा या दोन्हीं पैकी एकही गोष्ट स्मृती इराणी किंवा त्यांच्या मुलीच्या मालकीची नाही"

दरम्यान, झोईश इराणी यांनी वकिलां मार्फत यापूर्वीच तिच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. गोव्यातील 'सिली सोल्स' नावाच्या रेस्टॉरंटचे मालक नाही, ना मी चालवते. तसेच स्मृती यांनी देखील आरोप फेटाळून लावत स्पष्ट केलं होतं की, ही लढाई आपण न्यायालयात लढू. अस म्हणाल्या होत्या

काँग्रेसने आरोप करताना म्हटलं होतं की, उत्पादन शुल्क विभागाने इराणी यांच्या मुलीला कारणे दाखवा नोटीस दिली होती. नोटीस देणाऱ्या अधिकाऱ्याची कथितरित्या बदली करण्यात येत आहे. ही माहिती आरटीआयमधून मिळाली आहे. इराणींच्या मुलीने सिली बनावट दस्तऐवज देऊन बार लायसन्स मिळविले, असा काँग्रेसचे मीडिया व प्रचारप्रमुख पवन खेडा यांनी केला होता. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मृती इराणींना केंद्रीय मंत्रिमंडळातून काढून टाकावं, अशी मागणीही त्यांनी केली होती.

Updated : 2 Aug 2022 10:19 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top