Home > 'कळत नाही देशाच्या जनतेला सुधरवत आहात की बिघडवत'- रुपाली चाकणकर

'कळत नाही देशाच्या जनतेला सुधरवत आहात की बिघडवत'- रुपाली चाकणकर

कळत नाही देशाच्या जनतेला सुधरवत आहात की बिघडवत- रुपाली चाकणकर
X

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक नागरिकांनी दिपप्रज्वलनाचाही उत्सव साजरा करतानाचं चित्र पाहायला मिळालं. जमावाने रस्त्यावर गो कोरोना गो म्हणत मशाली आणि फटाके फोडण्यात आले. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर ‘पंतप्रधान महोदय,तुम्ही बनवलेले नियम तोडले गेले यासाठी तुम्हीच कारणीभूत आहात’ असं खापर फोडलं आहे.

मोदींच्या दिवेलावणीच्या आवाहनावर रुपाली चाकणकरांचा ‘हा’ मोठा निर्णय

मोदी साहेब आपण पंतप्रधान आहात की एव्हेंट मॅनेजर- रुपाली चाकणकर

'भाइयों और बहनो..' बोलून काहीच फरक पडणार नाही- रुपाली चाकणकर

कोरोनाच्या लढाईत देशाची एकात्मतेचं दर्शन घडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील नागरिकांना रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी दिपप्रज्वलन करण्याचं आवाहन केलं होत. या आवाहनाला देशभरातून संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला. राज्यातील नेतेमंडळी, सीनेकलाकार आणि सामान्य नागरिकांनी या मोहीमेत सहभाग घेत घरात दिपप्रज्वलन केलं. मात्र, अनेक ठिकाणी नागरिकांनी लॉकडाउन चं उद्दीष्ट धाब्यावर बसवून जमावाने दिप्रज्वलनाचा उत्सव साजरा केल्याचं पाहायला मिळालं.

यावर रुपाली चाकणकर यांनी “काही ठिकाणी लोक फटाके फोडत होते,शंख वाजवत होते तसेच ‘गो कोरोना गो’ हे म्हणत नाचत होते. काही लोक रस्त्यावर एकत्र येऊन दिवे पेटवण्याचे काम करत होते. पंतप्रधान महोदय,तुम्ही बनवलेले नियम तोडले गेले यासाठी तुम्हीच कारणीभूत आहात. . कळत नाही देशाच्या जनतेला सुधरवत आहात की बिघडवत आहात.” असा सवाल उपस्थित केला आहे.

रुपाली चाकणकर यांनी नरेंद्र मोदींच्या दिपप्रज्वलनाच्या निर्णयावर सुरुवातीपासूनच नाराजी व्यक्त केली होती. रविवारी त्यांनी आम्ही अंधानुकरण करणार नाही असं म्हणत लॉकडाउनचे नियम पाळून कोरोनाला हरवणार अशी भुमिका व्यक्त केली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवे लावण्याच्या आवाहनानंतरही त्यांनी मोदींवर बोचरी टीका करताना तुम्ही ‘तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात की, इव्हेंट मॅनेजर’ असा सवाल उपस्थित केला होता.

Updated : 6 April 2020 4:19 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top