Home > कोविड रूग्णालयाच्या तक्रारी पालकमंत्र्यांच्या कानावर, थेट घेतली रुग्णांची भेट   

कोविड रूग्णालयाच्या तक्रारी पालकमंत्र्यांच्या कानावर, थेट घेतली रुग्णांची भेट   

कोविड रूग्णालयाच्या तक्रारी पालकमंत्र्यांच्या कानावर, थेट घेतली रुग्णांची भेट   
X

अमरावती कोरोना रुग्णांच्या वाढतं प्रमाण लक्षात घेता जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि राज्याच्या महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर पुर्णपणे सक्रीय झाल्या आहेत. आज थेट जिल्हा कोविड रुग्णालयात एंट्री करुन रुग्णालयात दाखल रूग्णांशी त्यांनी संवाद साधला. भेटीदरम्यान कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांसह चर्चा करुन त्यांचं मनोबल वाढवण्यासह त्यांनी सर्व डॉक्टरांचेही कौतुक केलं आणि त्यांच्या सेवेबद्दल आभार व्यक्त केले.

गेल्या काही आठवड्यांपासून जिल्हा कोविड रूग्णालयाबाबत अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार आज प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणची परिस्थिती पाहण्याचा व रूग्णांशी थेट भेटण्याचा निर्णय यशोमती ठाकूर यांनी घेतला. त्यांनी सुपर स्पेशालिटी रूग्णालयातील स्थापित कोविड रूग्णालयाला भेट दिली. यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्हा कोविड रूग्णालयातील ओपीडी कक्षासह आयसीयू कक्षाचीही पाहणी केली.

“जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, डॉ. रवी भूषण यांचे पथक अहोरात्र मेहनत घेत आहेत. जोखमीच्या क्षेत्रात जीवाची पर्वा न करता काम करीत आहे. पीपीई कीट घालून ही मंडळी दिवसभर रूग्णसेवा देत असते. आज मी स्वत: पीपीई कीट घालण्याचा अनुभव घेतला. उन्हाळ्याचे दिवस असताना पीपीई कीट घालून दिवसभर काम करत राहणे किती कष्टप्रद असते, याचा अनुभव यानिमित्त मिळाला. सगळे डॉक्टर, पारिचारिका, सफाई कर्मचारी अखंडपणे सेवा करीत आहेत.

कोविड रूग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांशी मी संवाद साधला. त्यांना पुरविण्यात येणारे जेवण, औषधे, डॉक्टर व इतर कर्मचा-यांची सेवा व वागणूक याबाबत प्रत्येकाची मी स्वत: विचारपूस केली. त्यावेळी येय़े उपचार घेत असलेल्या रूग्णांनी आपणास समाधानकारक सेवा मिळत असल्याचे सांगितले. डॉ. रवी भूषण यांच्यासह सर्व डॉक्टर कर्मचारी अत्यंत चांगले काम करीत असल्याची माहिती रूग्णांनी दिली.” – यशोमती ठाकूर

Updated : 31 May 2020 8:37 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top