कोरोना विरुद्ध लढण्यासाठी जनतेने सहकार्य करावं- उद्धव ठाकरे
X
आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्याला संबोधित करत करोना व्हायरस च्या स्थितीबाबत राज्याला अवगत केलं. यावेळी त्यांनी राज्यात कोणकोणत्या उपाययोजना राबवल्या जात आहेत. याची माहिती जनतेला दिली. तसंच संसर्ग रोखण्यासाठी जनतेला सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे.
- कोरोना… मास्क आणि बावळटपणा!
- कोरोनाच्या फटक्याने सोन्याची झळाळी उतरली!
- VIDEO : राखी सावंत कोरोना व्हायरसला संपवण्यासाठी चीन च्या दौऱ्यावर..
“हे युद्ध आहे आणि त्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं सहकार्य हेच सरकारचं बळ आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. यंत्रणा म्हणजे रुग्णालयं, डॉक्टर्स, लॅब, जीवनावश्यक वस्तू अशा सगळ्या यंत्रणा तयार आहेत. घाबरून जाण्याचं कारण नाही,” असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी ‘करोना व्हायरससोबत हे युद्ध आहे. हे युद्ध सुरू झालं आहे.
त्यामुळे सगळ्यांनी जिद्दीनं लढा द्यायला हवा. घाबरून चालणार नाही. सर्वच सरकारी यंत्रणा करोनाला तोंड देण्यासाठी सज्ज आहे. यात राज्यातील जनतेनं सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचं पालन करून सहकार्य करावं. सरकार प्रसंगी कठोर निर्णय घेऊ शकते. ती वेळ आणू नका, असं कळळीचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं आहे. मुंबईतील लोकलची, बसेसची गर्दी आता ओसरली आहे. पण अनावश्यक प्रवास अजूनही होत आहे.
सरकारी ऑफिसमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती राहतील, यासाठीचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यामुळे आवश्यक असेल तरच बाहेर पडा असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. क्वारंटाइन केलं असताना बाहेर पडणं चुकीचं…
क्वारंटाइन केलं असताना बाहेर पडणं चुकीचं आहे. हातावर स्टँप मारलेला असताना काही लोक बाहेर फिरताना दिसले. त्यामुळे कळत-नकळत विषाणूचा प्रसार होतो. हे होऊ देऊ नका. अशी विनंती देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली आहे.
हा शिवरांयाचा लढवय्या महाराष्ट्र आहे. तो कोरोनाच्या संकटावर मात करेल. असं म्हणत कोरोनो सोबत सुरु झालेल्या या जागतिक युद्धात आपण नक्कीच जिंकू असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केला आहे.