'तो लुटायलाच आलेला आहे'; MoneyHeist वेबसिरीजवरून यशोमती ठाकूर यांचा मोदींवर निशाणा?
राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी आज एक ट्विट केलंय. या ट्विट मध्ये त्यांनी बोचरी टीका करत अप्रत्यक्षपणे हा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला आहे?
X
सध्या एका वेब सिरीजची चर्चा जगभर सुरू आहे. ती वेब सिरीज म्हणजे Money Heist. यामध्ये एक प्रोफेसर नावच पात्र आहे. प्रोफेसर हा त्याच्या चतुर डोक्याचा वापर करून बँकांवर दरोडा टाकत असतो व त्याला या कामात त्याची गँग मदत करत असते. प्रत्येक भागात काहीतरी नवीन सस्पेन्स व अनाकलनीय अस हे कथानक आहे. याच कथानकाशी तुलना करत यशोमती ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
यशोमती ठाकूर यांनी ट्विट करत म्हटले आहे की, "तो लुटायलाच आलेला आहे. मात्र त्याने जगासमोर स्वतःचं असं चित्र उभं केलंय जसं की तो मसीहाच आहे. मी राजकीय विषयांवर नाही तर #MoneyHeist बद्दल बोलतेय. गैरसमज झाल्यास योगायोग समजावा. अस ट्विट यशोमती ठाकूर यांनी केलय.
तो लुटायलाच आलेला आहे. मात्र त्याने जगासमोर स्वतःचं असं चित्र उभं केलंय जसं की तो मसीहाच आहे. 😊 मी राजकीय विषयांवर नाही तर #MoneyHeist बद्दल बोलतेय. गैरसमज झाल्यास योगायोग समजावा.
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) September 4, 2021
MoneyHeist या वेबसिरीजने सद्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.तसेच ट्विटरवर #MoneyHeist हा हॅशटॅग ट्रेडिंगमध्ये आहे. त्यातच आता MoneyHeist वरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुध्दा होत असल्याचे पाहायला मिळत आहे.