चंद्रकांत पाटीलांची झोप उडवणारं महिलेचं भाषण...
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूकीच्या निमित्ताने झालेल्या प्रचारसभेत काँग्रेस कार्यकर्त्या भारती पोवार यांनी चंद्रकांत पाटील, धनंजय महाडिक, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावर टीकेचा भडिमार केला.
X
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचे वातावरण तापलं आहे, आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काल काँग्रेसच्या एका प्रचार सभेत भारती पोवार यांनी केलेल्या भाषणाची सर्वत्र चर्चा आहे. चंद्रकांत पाटील, धनंजय महाडिक, प्रकाश आवडे यांच्यावर सडकून टीका करत त्यांचा समाचार घेणारे त्यांचे भाषण आता समाजमाध्यमांवर चांगलेच व्हायरल होतं आहे.
काही दिवसांपुर्वी धनंजय महाडिक यांनी महिलांना कमी लेखलं होतं. त्यांच्या या विचारांवर भारती पोवार यांनी सडकून टिका केली आहे. याशिवाय भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रकाश आवडे यांच्यावरही आपला टिकेचा आसुड ओढला. यानंतर त्यांनी काश्निर फाईल्स चित्रपटावरूनही भाजपला धारेवर धरलं. त्यांनी जमलेल्या श्रोत्यांना, "ज्यावेळी काश्मिरमध्ये काश्मिरी पंडीतांची हत्या झाली त्यावेळी केंद्रामध्ये व्ही.पी. सिंह यांचं सरकार होतं आणि काश्मिरचे राज्यपाल भारतीय जनता पक्षाचे जगनमोहन होते.", असं सांगत काश्मिर फाईल्सचं पाप हे काँग्रेसचं नाहीच ते भाजपचं आहे अशी घाणाघाती टिका त्यांनी केंद्र सरकारवर केली.
यानंतर त्यांनी आपला मोर्चा हा महागाईवरून केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्य़ाकडे वळवला. त्या म्हणाल्या मनमोहन सिंहांच्या कार्यकाळात सिलेंडर ४५० रूपयावर गेल्यामुळे स्मृती इराणी यांनी सरकारला बांगड्या दिल्या होत्या. मग आता सिलेंडरच्या किंमती १००० रूपयांच्या आसपास गेल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना साडी चोळी पाठवण्याचं आव्हान दिलं आहे. सविस्तर जाणून घेण्यासाठी पहा त्यांच्या भाषणाचा हा व्हिडीओ!