स्मृती इराणी का भडकल्या ?
गेल्या काही दिवसांपासून महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांवरुन संसदेचे कामकाज रोखून धरणाऱ्या काँग्रेसची अधीर रंजन चौधरी यांच्या वक्तव्यामुळे कोंडी झाली आहे.
X
काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद गुरूवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात उमटले. गेल्या काही दिवसांपासून महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांवरुन संसदेचे कामकाज रोखून धरणाऱ्या काँग्रेसची अधीर रंजन चौधरी यांच्या वक्तव्यामुळे कोंडी झाली आहे.
खासदारांचे निलंबन, महागाईवर संसदेत चर्चा करण्याची मागणी, सोनिया गांधी यांची ईडी चौकशी या सगळ्या मुद्द्यांवरुन काँग्रेस खासदार गेल्या काही दिवसांपासून संसदेबाहेर आंदोलन करत आहेत. या आंदोलना दरम्यान एका न्यूज चॅनेलशी बोलताना अधीर रंजन चौधरी यांनी द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख राष्ट्रपत्नी असा केला. त्यांच्या याच वक्तव्यावरुन भाजपने आता अधीर रंजन चौधरी यांनी माफी मागावी अशी मागणी करत लोकसभा आणि राज्यसभेत आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे गदारोळ झाला .
केंद्रीय मंत्री स्मृती इऱाणी यांनी लोकसभेत य़ाच मुद्द्यावरुन काँग्रेसवर जोरदार प्रहार केला. काँग्रेसने एका आदिवासी महिलेचा, राष्ट्रपतीपदाचा अपमान केला आहे, असा आरोप करत सोनिया गांधी यांनी यावर उत्तर द्यावे अशी मागणी केली. तर राज्यसभेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हाच मुद्दा उपस्थित करत जोरदार टीका केली. तसेच चौधरी यांनी माफी मागावी अशी मागणी केली.
दरम्यान काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी यांनी हे ट्विट केले आहे .
— Adhir Chowdhury (@adhirrcinc) July 28, 2022