युपीत १० लाख कोरोनाबाधित आहेत का? प्रियांका गांधींचा योगींना सवाल
X
कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी उत्तरप्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Aadityanath) यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर त्यांनाच खोटे ठरवणाच्या हेतुने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. आदित्यनाथ यांनी मुंबई, दिल्ली आणि इतर राज्यातून आलेल्या कामागारांमध्ये कोरोना व्हायरसचं संक्रमण मोठया प्रमाणात असल्याचं म्हटलंय. मात्र, त्यांनी दिलेले आकडे युपीतील सद्यपरिस्थिशी जुळत नाहीत.
हे ही वाचा...
- भाजप आपल्या पापांनीच मरत आहे, रुपाली पाटील यांचा आक्रमक टोला
- ‘एकवेळ माझा गळा चिरा पण..’,आंदोलनकर्त्यांना ममता बॅनर्जींचं भावनिक आवाहन
- आम्ही ट्रोल का होतोय?
आदित्यानाथ यांनी म्हटलंय की, “मुंबईतून येणारे जे कामगार आहेत त्यांच्यात ७५% लोक असे आहेत ज्यांना कोरोनाचं संक्रमण आहे. दिल्लीतून येणारे जे कामगार आहेत त्यांच्यात ५०% लोकांना कोरोनाचा संक्रमण आहे. तर इतर राज्यांतून येणाऱ्या कामगारांमध्ये २५% लोकांना कोरोनाचं संक्रमण आहे.”
यावर प्रियांका गांधी यांनी सरकारी आकड्यांनुसार साधारण २५ लाख लोक युपीमध्ये परतले आहेत. आदित्यनाथ यांनी दिलेल्या आकड्यानुसार १० लाख लोक कोरोना व्हायरसने संक्रमित आहेत का? असा सवाल केला आहे. ‘जर स्थिती सांभाळू शकत नसाल तर खुर्ची खाली करा. कामापासून तोंड फिरवू नका’ असा टोलाही प्रियांका गांधी यांनी लगावला आहे.