#MPSC : त्या व्हायरल व्हिडिओ वर मुख्यमंत्री काय म्हणतात पहा..
MPSC( महाराष्ट्र लोकसेवा अयोग ) विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भारतीय लोकसेवा आयोगाऐवजी, निवडणूक आयोगाकडे प्रश्न मांडला आहे, असं वक्तव्य केलं त्यानंतर त्यांचा हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर जोरदार व्हायरल होऊ लागला. या व्हिडिओ वर आता मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका मांडली आहे काय म्हंटल आहे त्यांनी पहा..
X
MPSC विद्यार्थ्यांचा प्रश्न सध्या चांगलाच चर्चेत आहे. विविध राजकीय पक्षाचे नेते या आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत, तसेच आंदोलंनाला पाठींबाही देत आहेत. राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांनीं परवा रात्री उशिरा या विद्यार्थ्यांची भेट घेत या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. MPSC विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर माध्यमांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी संवाद साधला त्यावर प्रतिक्रिया देतांना , " शिंदे लोकसेवा आयोगाऐवजी निवडणूक आयोगावर बोलल्याने, मुख्यमंत्र्यांना नक्की काय म्हणायचं होत हा संभ्रम निर्माण झाला, शिंदेंच्या या वक्तव्याचा विडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे.
एकनाथ शिंदे नेमके काय म्हणाले?
“एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसोबत मी स्वतः बोललो. जी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली, तिच भूमिका सरकारची देखील आहे. ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह या दोन पद्धतीबाबत काही सूचना आल्या आहेत. २०२५ पासून जी नवी पद्धत सुरु करण्यात येणार होती, त्याबाबत आम्ही निवडणूक आयोगाला पत्र दिले असून त्यांना कळवले आहे. निवडणूक आयोगाकडून सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या भूमिकेबाबत सरकार सहमत असून निवडणूक आयोगाने देखील तशाच प्रकारचा निर्णय घ्यावा, अशी आमची अपेक्षा आहे.” वृत्तावाहिनींच्या प्रतिनिधींशी बोलत असताना मुख्यमंत्री म्हणाले.
यांना उठता, बसता, खाता, पिता, झोपता, जागता, जाता, येता, बोलता फक्त आणि फक्त निवडणूक आयोगच दिसतो वाटतं... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमपीएससी विद्यार्थ्यांचे निवेदन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला देण्याऐवजी निवडणूक आयोगाला पाठवले, यातच सगळे आले...@mieknathshinde pic.twitter.com/Nm0iSWNJyv
— NCP (@NCPspeaks) February 22, 2023
मुख्यमंत्र्यांच्या विधानावरून राष्ट्रवादीचा शिंदेंवर निशाणा
“यांना उठता, बसता, खाता, पिता, झोपता, जागता, जाता, येता, बोलता फक्त आणि फक्त निवडणूक आयोगच दिसतो वाटतं…असं म्हणत शिंदेंच्या वक्तव्याचा राष्ट्रवादीकडून चांगलाच समाचार घेण्यात आला आहे . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमपीएससी विद्यार्थ्यांचे निवेदन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला देण्याऐवजी निवडणूक आयोगाला पाठवले, यातच सगळे आले…”, असे खोचक ट्विट राष्ट्रवादीने केले आहे.
साहेबांनी #MPSC विद्यार्थ्यांचे निवेदन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला देण्याऐवजी निवडणूक आयोगाला पाठवले, असे चुकुन सांगितले असावे. pic.twitter.com/dnJp0EmpN6
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) February 22, 2023
या व्हिडिओ बाबत मुख्यमंत्री काय म्हणाले?
विद्यार्थ्यांची भूमिका रास्त आहे आणि त्यांची भूमिका एमपीएससीने मान्य करावी अशा प्रकारची विनंती आम्ही त्यांना केली आहे. मला खात्री आहे की, यामध्ये विद्यार्थ्यांची भूमिका जी आहे तशाच प्रकारचा निर्णय होईल. मी उद्या पुन्हा एमपीएससी चेअरमन आणि सदस्यांसोबत बोलणार आहे. नक्कीच यातून विद्यार्थ्यांच्या बाजूचा निर्णय लागेल. काल माझ्याकडून अनावधानाने एमपीएससीच्या ऐवजी निवडणूक आयोग असं गेले. महाराष्ट्र लोकसेवा आयोग पाहिजे होतं तर निवडणूक आयोग असं माझ्या तोंडून अनावधानाने निघाले आहे. आता निवडणूक आयोग, निवडणूक आयोग अशीच सर्वत्र चर्चा सुरू आहे तर चुकून अनावधानाने हे झालं असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले..