...आणि म्हणून बीड जिल्ह्याचा दौरा अर्धवट सोडून चित्रा वाघ मुंबईकडे रवाना
Admin | 18 July 2021 6:56 PM IST
X
X
आपल्या आक्रमक भुमिकेमुळे महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ सद्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मात्र अचानकपने त्या आपला दौरा अर्धवट सोडून मुंबईकडे रवाना झाल्या आहेत. याबाबतची माहिती त्यांनी खुद्द ट्वीट करून दिली आहे. चित्रा वाघ यांनी ट्वीट करत म्हंटले आहे की, "आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे, शिरूर कासार येथे विशाल कुलथेच्या परीवाराची भेट घेतली. पुढे बीड दींद्रूड असा दौरा होता परंतु, माझ्या घरी मेडीकल इमर्जन्सी आल्याने बीड दौरा अर्धवट टाकून मला मुंबईला परत यावं लागतयं. मात्र लवकरचं पुन्हा नियोजन करून मी बीड दौर्यावर येईन, असे चित्रा वाघ यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हंटले आहे.
राज्यातील महिला अत्याचाराच्या घटनेवरून चित्रा वाघ गेल्या काही दिवसांपासून आक्रमक भूमिका घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. एवढच नाही तर ठाकरे सरकारमधील एका मंत्र्याला चित्रा वाघ यांच्यामुळे घरी बसावं लागले आहे.
Updated : 18 July 2021 6:56 PM IST
Tags: Chitra Wagh चित्रा वाघ
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire