Home > Political > चित्रा वाघ यांचा भाजपच्या राष्ट्रीय कार्यकरणीत समावेश

चित्रा वाघ यांचा भाजपच्या राष्ट्रीय कार्यकरणीत समावेश

ठाकरे सरकारला वेळोवेळी धारेवर धरणाऱ्या आणि भाजपच्या आक्रमक नेत्या म्हणून ओळख असलेल्या चित्रा वाघ यांच्यावर पक्षाने नवीन जवाबदारी दिली आहे. चित्रा वाघ यांचा राष्ट्रीय कार्यकरणीत समावेश करण्यात आला आहे.

चित्रा वाघ यांचा भाजपच्या राष्ट्रीय कार्यकरणीत समावेश
X

पुढील वर्षी येऊ घातलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होण्यापूर्वी भाजपने आपली नवीन राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर केले आहे. या राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राजनाथ सिंह आणि मुरलीमनोहर जोशी यांच्या नावाचा समावेश आहे. तसेच कार्यकारिणीत महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस मधून भाजप मध्ये आलेल्या राज्याच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांचा समावेश करण्यात आला आहे.

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून चित्रा वाघ ह्या अनेक मुद्द्यांवर आक्रमक होताना दिसते आहेत. महिलांच्या संदर्भातील प्रत्येक प्रश्न त्या उचलून धरत असतात. त्यांची हीच आक्रमक भूमिका पाहता भाजपने त्यांच्यावर आता नवीन जबाबदारी सोपवली आहे. ही कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर चित्रा वाघ यांनी ट्विट करत भारतीय जनता पार्टी, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत दादा पाटील यांचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर त्यांनी पक्षाने दिलेल्या जबाबदारीला पूर्ण न्याय देईल असा विश्वास देखील व्यक्त केलाय.

या यादीत महाराष्ट्रात पंकजा मुंडे, विनोद तावडे, सुनील देवधर यांचा पुन्हा एकदा समावेश करण्यात आला आहे. नितीन गडकरी, पियूष गोयल, प्रकाश जावडेकर, विनय सहस्त्रबुद्धे, चित्रा वाघ यांचा समावेश आहे.

Updated : 7 Oct 2021 9:52 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top