Home > Political > ठाकरे सरकार आणखी किती मायभगिनींचा तळतळाट घेणार: चित्रा वाघ

ठाकरे सरकार आणखी किती मायभगिनींचा तळतळाट घेणार: चित्रा वाघ

ठाकरे सरकार आणखी किती मायभगिनींचा तळतळाट  घेणार: चित्रा वाघ
X

मुंबई: राज्यात वाढत असलेल्या महिला अत्याचाऱ्या घटनेवरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. 'राज्यातील किती मायभगिनींचा रोज तळतळाट घेणार हे सरकार',असा टोलाही त्यांनी लगावला.

माजलगाव येथील चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यावरून चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर टीका करत म्हंटलं आहे की, सत्तेत आल्यावर महिला मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा महत्वाचा रहात नाही का ?, बलात्कार,सामुहीक बलात्कार,अल्पवयीन मुलींचं बेपत्ता होणं आशा केसेस रोज वाढताहेत. सर्वसामान्यांसोबत पोलिस दलातील महिला पोलिस ही लैंगिक अत्याचाराच्या बळी पडताहेत. त्यामुळे, राज्यातील किती मायभगिनींचे तळतळाट हे सरकार रोज घेणार आहे, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.


राज्यातील महिला अत्याचाराच्या घटना वाढत असून, आशा घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी सुद्धा केली आहे. याबाबत त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना निवेदन सुद्धा दिले आहे.

Updated : 7 July 2021 8:26 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top