"...साहेब ..विद्यार्थ्यांच्या वडीलांच्या स्वप्नांचा पण विचार करा ना.." चित्रा वाघ यांचा आरोग्य विभागाच्या परीक्षा पुन्हा रद्द झाल्याने मुख्यमंत्र्यांवर निशाणा..
X
राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षा आता पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अशा प्रकारे पुन्हा एकदा परीक्षा पुढे गेल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला आहे. विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सध्या तोंड द्यावे लागत आहे. सध्या राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षा वरून जो काही गोंधळ सुरू आहे यांच्यावरून भाजप महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर 'दोनदा आरोग्य विभागाच्या परीक्षेत गोंधळ झालाय.. साहेब..राज्यातील विद्यार्थ्यांच्या वडिलांच्या स्वप्नांचा पण विचार करा ना' असे म्हणत निशाणा साधला आहे.
चित्रा वाघ यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वरती आरोग्य विभागाच्या परीक्षा वरून ही टीका केली आहे. त्यांनी ट्विट मध्ये "मुख्यमंत्री काल म्हणालेत कि मी मुख्यमंत्री बनून माझ्या वडीलांचं स्वप्न पूर्ण केलंय…दोनदा आरोग्य विभागाच्या परिक्षेत गोंधळ झालाय.. साहेब... राज्यातील विद्यार्थ्यांच्या वडीलांच्या स्वप्नांचा पण विचार करा ना……" असे म्हंटल आहे.
काल मुंबई येथे पार पडलेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना प्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जे भाषण केले. त्यांनी या भाषणात भाजपमधील अनेक नेत्यांवर टीका केली. उद्धव ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधकांवर जोरदार
शाब्दिक हल्ला चढवला होता. याच भाषणात बोलताना त्यांनी मी मी मुख्यमंत्री बनून माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले असं म्हटलं होतं. याच भाषणाचा आधार घेत चित्रा वाघ यांनी सध्या आरोग्य विभागाच्या परीक्षा दुसऱ्यांदा रद्द झाल्या आहेत त्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ती निशाणा साधला आहे.