Home > 'डिअर सोनू सूद, राऊत कडे लक्ष देऊ नकोस'

'डिअर सोनू सूद, राऊत कडे लक्ष देऊ नकोस'

डिअर सोनू सूद, राऊत कडे लक्ष देऊ नकोस
X

लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरीत प्रवासी मजुरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. या काळात अभिनेता सोनू सुद हा मजुरांसाठी धावून आला. देशभरातील सर्वच राज्यांमध्ये त्याने शहरातील मजूरांना त्यांच्या गावापर्यंत पोहोचवले. महाराष्ट्रातून सर्वाधिक मजूरांना त्यांने घरी पाठण्याची व्यवस्था केली होती. संकटाच्या काळात धावून आलेला सोनू सूद सामान्यांसाठी सरकारपेक्षाही मोठा झाला.

सोनू सूदच्या मदतकार्याला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून केलेल्या आरोपांमुळे राजकीय रंग चढला आहे. सोनू सुद च्या कार्यमागे भाजपचा हात असल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर सोनू सुद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी थेट मातोश्रीवर धडकला. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधताना व्हॉट्सएप वर व्हायरल होत असलेला मेसेज आपल्या ट्वीटरवर शेअर करत चांगलाच समाचार घेतला आहे.

“डिअर सोनू सूद, राऊत कडे लक्ष देऊ नकोस, तू खूप चांगलं काम करत आहेस. लक्षात ठेव आपल्याला रोगाशी लढायचं आहे, रोग्याशी नाही.” अशा शब्दात त्यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

Updated : 9 Jun 2020 3:10 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top