Home > Political > "गृहमंत्री गुन्हेगारांना, बलात्काऱ्यांना बळ देण्यासाठी तत्पर" चित्रा वाघ यांची टीका

"गृहमंत्री गुन्हेगारांना, बलात्काऱ्यांना बळ देण्यासाठी तत्पर" चित्रा वाघ यांची टीका

गृहमंत्री अनिल देशमुख व जयंत पाटील यांचा गुन्हेगारांसोबत व्हायरल झालेल्या फोटोवर चित्रा वाघ यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

गृहमंत्री गुन्हेगारांना, बलात्काऱ्यांना बळ देण्यासाठी तत्पर चित्रा वाघ यांची टीका
X

गृहमंत्री अनिल देशमुख औरंगाबाद दौऱ्यावर असताना त्यांच्या सोबत बाजूला गुन्हेगारांचा घोळका असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या फोटोमुळे राज्याचे गृहमंत्री ट्रोल होत असतानाच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील "रक्षक नाही हे तर भक्षक" असं म्हणत टीका केली आहे.

काय म्हणाल्या चित्रा वाघ?..

"बलात्कारी व गुन्हेगारांना "शक्ती" देण्याची मोहीमच जणू गृहमंत्र्यांनी उघडलीये. अन्याय अत्याचारग्रस्त महिलांची भेट घेण्यास त्यांचे सात्वंन करण्यास गृहमंत्र्यांना वेळ नाही पण गुन्हेगारांना बलात्कार्यांना बळ देण्यास मात्र तत्पर.."

"हे कसले रक्षक हे तर नराधमांना पाठीशी घालणारे भक्षक" अशा आशयाचं ट्वीट चित्रा वाघ यांनी केलं आहे.

दरम्यान, अनिल देशमुख औरंगाबाद दौऱ्यावर असताना गुन्हेगारांनी पुष्पगुच्छ देऊन गृहमंत्री अनिल देशमुख यांचं स्वागत केल्याचं फोटोमध्ये दिसत आहे. कलाम कुरेशी, सय्यद मातीन आणि जफर बिल्डर हे गंभीर गुन्हे असलेले तिघेजण फोटोत पाहायला मिळत आहेत. देशमुख यांच्यासोबत फोटो काढलेल्या तिन्ही गुन्हेगारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. एक गुटखा किंग, तर दुसरा ट्रक चोर असून तिसऱ्या आरोपीवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल असल्याची माहिती आहे.

Updated : 2 Feb 2021 6:30 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top