"मी राजीनामा देईन जर..." चित्रा वाघ
X
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी पार पडल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार हा महिना संपून गेला तरी झाला नव्हता.पण मंगळवारी मंत्र्यांचा शपथविधी पार पडला.यामध्ये भाजपचे ९ आणि शिंदेसेना गटाचे ९ असे एकूण १८ मंत्र्यांनी शपथ घेतली . दरम्यान संजय राठोड यांना मंत्री पद दिल्याने चित्रा वाघ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
"संजय राठोड यांना ठाकरे सरकारनेच क्लीन चीट दिली आहे ,त्यामुळे आमचा न्यायालयीन लढा हा चालूच राहणार आहे आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे" असं मत चित्रा वाघ यांनी व्यक्त केला आहे
"त्याचबरोबर ठाकरे सरकार मधील राष्ट्रवादी ,शिवसेना आणि काँग्रेस पक्षाने करूणा मुंडेंची माफी मागितली पाहिजे ,सुप्रिया सुळे खूप मोठ्या नेत्या आहेत मोठ्या नेत्यांनी आम्हाला शहाणपण शिकवू नये". दिल्लीत पत्रकारांशी बोलताना चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांच्या टीकेला उत्तर दिले आहे .मंत्रिमंडळ विस्तारात संजय राठोड यांना मंत्री पद मिळाल्याने नाराज असलेल्या भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना हा संवाद साधला.
माझा राजीनामा देऊन जर त्या मुलीला न्याय मिळणार असेल तर मी नक्की राजीनामा देईल ,असं वक्तव्य चित्र वाघ यांनी केले आहे. ज्यावेळी त्या मुलीवर अत्याचार होत होता त्यावेळी या महिला नेत्यांची हात कोणी बांधले होते का ?असा प्रश्न चित्र वाघ यांनी उपस्थित केला आहे . भाजप हा एकमेव असा पक्ष आहे ज्यामध्ये जास्त महिला आमदार आहेत आणि त्या सर्व कर्तबगार आहेत आणि त्यामुळे लवकरच आमच्या कर्तबगार महिला आमदारांची मंत्री म्हणून वर्णी लागेल आणि त्या उत्कृष्ट काम करतीळ असा विश्वास चित्र वाघ यांनी व्यक्त केला आहे