Home > निलेश राणेंवर गुन्हा दाखल, माफी मागतानाही केलं ‘हे’ खोचक ट्वीट  

निलेश राणेंवर गुन्हा दाखल, माफी मागतानाही केलं ‘हे’ खोचक ट्वीट  

निलेश राणेंवर गुन्हा दाखल, माफी मागतानाही केलं ‘हे’ खोचक ट्वीट  
X

ट्वीटरवर नेहमीच वादग्रस्त विधानं करणारे भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यावेळी चांगलेच अडचणीत सापडताना दिसत आहेत. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांच्यावर टीका करताना ‘हिजडा’ असं संबोधन करण्यावरुन त्यांच्यावर जळगावात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या...

या प्रकरणाला वाच्यता फोडणाऱ्या तृतीय़पंथी सारंग पुणेकर (Sarang Punekar) यांनी निलेश राणे यांना शब्द मागे घेत माफी मागण्याचा इशारा दिला होता. “हिजडा शब्दाचा अर्थ माहिती नसेल तर मी सांगते. शब्द मागे घ्या नाहीतर योग्य ठिकाणी बाजार उठवला जाईल” असं सारंग पुणेकर यांनी म्हटलं होतं.

हे ही वाचा...

जळगावच्या यावल तालुक्यातील फेजपूरच्या सामाजिक कार्यकर्ता शमिभा पाटील यांनी निलेश राणे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार केली. निलेश राणे यांनी तृतीयपंथी समाजावर उपहासात्मक आणि अब्रुनुकसानीकारक वक्तव्य केलं आहे, अशी प्रतिक्रिया शमिभा पाटील यांच्याकडून देण्यात आली आहे.

निलेश राणे या प्रकरणात तृतीयपंथीयांची ट्वीटरच्या माध्यमातून माफी मागितली आहे. मात्र, ती माफीमध्ये कोणत्याही प्रकारचा पश्चाताप किंवा चुकीच्या शब्दप्रयोगाची जाणीव दिसून येत नाही. निलेश राणे यांनी म्हटलंय की, “मी जर तृतीयपंथीयांच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. माझा रोख एका व्यक्तीवर होता इतर कोणावर नाही... पण तुम्ही माझ्यावर केसेस केल्या तरी चालतील कारण माझा उद्देश तुम्हाला दुखावण्याचा कधीच नव्हता.” असं ट्वीट केलं आहे.

सोबतच त्यांनी राष्टवादी पक्षाला तृतीयपंथीयांचा आसरा घ्यावा लागतोय ह्याचं नवल वाटतय असा टोला राष्ट्रवादी पक्षाला लगावला आहे.

यावेळी निलेश राणे यांनी प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यावरही निशाणा साधलाय. प्रकाश आंबेडकर यांनी त़ृतीयपंथीय समुदायाला पाठींबा दर्शवताना निलेश राणे यांनी माफी मागावी अशी मागणी केली होती. यावर निलेश राणे यांनी त्यांना २०१९ लोकसभा निवडणुकीची आठवण करुन देत ‘प्रकाश आंबेडकर काय बोलतात मी काय महाराष्ट्र पण लक्ष देत नाही’ असा टोला लगावला आहे.

Updated : 21 May 2020 10:31 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top