अमरावती विधानसभा मतदारसंघातून आमदार सुलभा खोडके यांना उमेदवारी
X
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष हे कामाला लागले आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपली पहिली यादी जाहीर केली. पहिल्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा समावेश आहे. बारामती मधून स्वतः अजित पवार, धनंजय मुंडे यांना परळीतून, येवलामधून छगन भुजबळ इत्यादींसह अनेक दिग्गज नेत्यांचे या यादीत नावं जाहीर करण्यात आले आहे.
दरम्यान, या यादीत अमरावती विधानसभा मतदारसंघातून सुलभा खोडके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सुलभा खोडके यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत काँग्रेस पक्षातून त्यांना सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर त्या अजित पवार यांच्या पक्षात जाणार असल्याच्या बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. अखेर या चर्चेवर आता शिक्कामोर्तब झाला असून, सुलभा खोडके यांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या यादीत नाव जाहीर झाले आहे.